विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : ओमायक्रॉन हा विषाणू जगातील 100 देशांपेक्षा अधिक देशांमध्ये आढळून आलेला आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेकडून योग्य ती काळजी घेण्याची सूचना देण्यात आलेल्या आहेत. युनायटेड स्टेट्स आणि युनायटेड किंग्डममध्ये ओमायक्रॉन विषाणूचे वाढते संसर्ग आढळून येत आहेत.
A total of 3 billion people could be infected with the omecron virus in the next 2 months; World Health Organization
वॉशिंग्टन विद्यापीठातील जागतिक आरोग्य संशोधन केंद्र, इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन तर्फे गुरूवारी एक रिपोर्ट जाहीर करण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार पुढील दोन महिन्यांमध्ये एकूण तीन अब्ज लोकांना ओमायक्रोन या व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो. आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण कोरोणा रूग्णांच्या संख्येपेक्षा ही संख्या पुढील दोन महिन्यांमध्ये तीन पटीने वाढू शकते.
Omicron Alert : ओमायक्रॉनसंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी बोलावली महत्वाची बैठक
या रिपोर्टमध्ये असेदेखील सांगण्यात आले आहे की, या व्हायरसची तीव्रता डेल्टा व्हेरियंट इतकी नसणार. तर मृत्यू दर देखील कमी असणार आहेत. आधी जितक्या लोकांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावे लागले होते त्या तुलनेत चार ते पाच टक्के लोकांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट व्हावे लागेल.
पण संसर्ग झालेल्या लोकांची संख्या डेल्टा प्रकरणामुळे संसर्ग झालेल्या लोकांच्या प्रमाणामध्ये तिप्पट असणार आहे असे देखील म्हटले आहे. लसीकरण जितके जास्त होईल तितके हा ही संख्या कमी होईल.
A total of 3 billion people could be infected with the omecron virus in the next 2 months; World Health Organization
महत्त्वाच्या बातम्या
- अकोला विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाच्या कामाबाबतचा प्रश्न लवकर सुटणार – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
- हैदराबादच्या नामांतराचा मुद्दा ऐरणीवर, सरसंघचालकांकडूनदेखील उल्लेख भाग्यनगरच!
- टीएमसीला खूप महत्व देण्याचे कारण नाही, गोव्यात त्यांची एक टक्काही मते नाहीत, अरविंद केजरीवाल यांची टीका
- मोदीचा आदर्श की मंदिरांचे राजकारण, ओरिसामध्ये नवीन पटनाईक यांच्याकडून मंदिरांच्या नूतनीकरणाचा कार्यक्रम