• Download App
    भारतीय IT प्रोफेशनल्सना मिळणार दिलासा; अमेरिकेतच 20 हजार एच-1 बी व्हिसाचे झटपट नूतनीकरण|A relief for Indian IT professionals; Instant renewal of 20 thousand H-1B visas in America itself

    भारतीय IT प्रोफेशनल्सना मिळणार दिलासा; अमेरिकेतच 20 हजार एच-1 बी व्हिसाचे झटपट नूतनीकरण

    वृत्तसंस्था

    वॉशिंग्टन : अमेरिकेत वास्तव्याला असलेल्या हजारो एच-१ बी व्हिसाधारकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. अमेरिकन सरकारने २० हजार एच-१ बी व्हिसाधारकांना नूतनीकरणाची प्रक्रिया जलदगतीने करण्याची घोषणा केली. त्यासाठी व्हिसाधारकांना केवळ आपला व्हिसा पोस्टाने अमेरिकन परराष्ट्र विभागाला पाठवावा लागेल. त्यानंतर लगेच त्याचे नूतनीकरण होईल. तत्पूर्वी एच-१ बी व्हिसाधारकांना नूतनीकरणासाठी अमेरिकेच्या बाहेर संबंधित देशात समक्ष हजर व्हावे लागे. योजनेचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे. प्रायोगिक तत्त्वावर या टप्प्यात २० हजार व्हिसाधारकांना २०२४ च्या पहिल्या तिमाहीत जलदगती प्रक्रियेअंतर्गत व्हिसाचे नूतनीकरण सुविधेचा लाभ मिळेल. ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने एच-१ बी व्हिसासाठी डोमेस्टिक नूतनीकरण सेवा बंद केली होती. आता नव्या सुविधेमुळे अनेक एच-१ बी व्हिसाधारकांना दिलासा मिळेल. मुदत संपत आलेल्यांनाही लाभ होईल. कारण आधी देश किंवा परदेशातील राजदूत कार्यालयात व्हिसा स्टॅम्प करणे अनिवार्य होते.A relief for Indian IT professionals; Instant renewal of 20 thousand H-1B visas in America itself



    अमेरिकेकडून गतवर्षी 1.40 लाख भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा.               

    अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन प्रशासनाने भारतासोबत संपर्क वाढवण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी 1.40 लाख लाखांहून जास्त भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा दिला होता. उपपराष्ट्रमंत्री स्टफ्ट म्हणाले, व्हिसाच्या मुलाखतीचा कालावधी कमी करण्यासाठी अमेरिकन प्रशासन प्रयत्न करत आहे. त्यासाठी अमेरिकन कर्मचारी आठवड्यातील सहा-सात दिवस काम करत आहेत. वर्ग सुरू होण्याच्या आधी विद्यार्थ्यांच्या मुलाखती पूर्ण करण्याच्या योजनेवर काम सुरू आहे. भारतात 10 लाख व्हिसा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या संख्येची घोषणा झाली. हे उद्दिष्ट आम्ही लवकरच पूर्ण केले. कारण त्यावर आम्ही अनेक महिन्यांपासून काम करत होतो. 2024च्या प्रतीक्षा अवधीही कमी करण्यावरही काम केले जात आहे.

    भारतीय आयटी प्रोफेशनल्ससाठी आनंदाची बातमी, H-1B Visa वरील निर्बंध संपुष्टात

    पंतप्रधानांच्या दौऱ्यात घोषणा, भारतीयांना जास्त लाभ

    20 हजार लोकांना पायलट प्रोजेक्टद्वारे लाभ मिळेल. परंतु निवड प्रक्रियेबद्दल मात्र काहीही तपशील मिळालेला नाही. डिसेंबरमध्ये या प्रक्रियेविषयी अधिकचा तपशील जाहीर होईल असे म्हटले जाते. या निर्णयाचा अमेरिकेत वास्तव्याला असलेल्या हजारो भारतीय आयटी व्यावसायिकांना लाभ होईल. जून 2023 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान व्हाइट हाऊसने हे जाहीर केले होते.

    A relief for Indian IT professionals; Instant renewal of 20 thousand H-1B visas in America itself

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या