विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : अचानक एका दिवशी मेसेज येतो की तुमच्या खात्यावर ३ लाख २५ हजार कोटी (५० बिलीयन डॉलर्स) रुपये जमा झाले आहेत! त्या दोघांना हार्ट अॅटॅक येणेच बाकी होते. मात्र, त्याने शहाणपणाने बॅँकेला फोन केला आणि विचारले. बॅँकेने तांत्रिक चुकीमुळे हे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाल्याचे सांगितले. त्यामुळे ते परतही गेले. परंतु, काही दिवस तरी त्यांना अब्जाधिश असल्याची भावना अनुभवता आली.A few days billionaire, A few days back, the bank had mistakenly deposited Rs 3 lakh 25 thousand crore in his account
अमेरिकेतील लुझियाना प्रांतातील एका कुटुंबाबाबत हा प्रकार घहला. रिअल इस्टेट एजंट असलेल्या जेम्स याला एका दिवशी बायकोचा फान आला. त्यांच्या संयुक्त खात्यावर प्रचंड मोठी म्हणजे ५० बिलीटन डॉलर्सची रक्कम जमा झाली आहे.
एक क्षण जेम्सला वाटले की आपल्या कोणा अज्ञात धनाड्य काकाने तर ही रक्म आपल्या नावावर केली नाही ना? पण त्याला माहित होते हे कथा-कादंबऱ्या आणि चित्रपटातच घडते. त्यामुळे त्याने शहाणपणाने बॅँकेत फोन केला आणि त्यांना हा प्रकार सांगितला. आपल्या खात्यात ही रक्कम जमा कशी झाली हे देखील विचारले.
बॅँकेने ही तांत्रिक चूक असल्याचे सांगितले परंतु नक्की कशामुळे हा प्रकार घडला हे सांगण्यास नकार दिला. त्यानंतर काही दिवसांतच जेम्सच्या अकाऊंटवरून ही रक्कम परत बॅँकेत गेली. परंतु, जेम्सने आपल्या अकाऊंटचा फोटो काढून ठेवला होता.
जन्मभराची आठवण म्हणून.जेम्स म्हणाल हा एक प्रचंड अनुभव होता. तुमच्य बॅँकेच्या खात्यातील पैशांसमोर इतके झिरो आहेत हे पाहणेच आनंददायी होते.जर ही रक्कम आपल्याकडे राहिली असती तर गरजूंना आर्थिक मदत केली असती. त्याचबरोबर मुलांसाठीएक रुग्णालयही बांधले असते असेही जेम्सने सांगितले.
आत कोणी म्हणेल की जेम्सने ही रक्कम लगेच दुसऱ्या अकाऊंटवर का वळविली नाही? याचे कारण म्हणजे बॅँकेच्या कायद्यानुसार चुकून जर मोठी रक्कम कोणाच्या खात्यावर जमा झाली असेल तर ती त्या व्यक्तीला पुन्हा बॅँकेला द्यावी लागते. स्वत:कडे ठेवता येत नाही. ही रक्कम खर्च केली तर त्याच्यावर गुन्हाही दाखल होऊ शकतो.
२०१९ मध्येही एका अमेरिकेतीलच एका महिलेच्य खात्यात ३७ मिलीयन डॉलर्सची रक्कम अशा प्रकारे जमा झाली होती. आपल्या बॅँकेच्या खात्यात ऐवढी रक्कम पाहून तिला अत्यानंद झाला. तिने आपल्या नवऱ्याला हे सांगितले. त्याने सल्ला दिला की तातडीने बॅँकेला कळवून टाक की चुकीने मोठी रक्कम तिच्या खात्यात जमा झाली आहे. बॅँकेने लगेचच ही रक्कम तिच्या खात्यावरून वळविली.
A few days billionaire, A few days back, the bank had mistakenly deposited Rs 3 lakh 25 thousand crore in his account
महत्त्वाच्या बातम्या
- तालीबान्यांच्या कुटुंबांना पाकिस्तान पोहोचतेय, इम्रान मंत्रीमंडळातील मंत्र्यानेच केला गौप्यस्फोट
- इथेनॉलचा वापर करून वाहने चालविणारी फ्लेक्स इंजिन तयार होणार, तीन महिन्यांत योजना आणणार असल्याची नितीन गडकरी यांची माहिती
- कोट्यवधी भारतीयांचा नारा जय हिंद द्रुमुकला मात्र खटकतोय, राज्यपालांच्या अभिभाषणातूनच वगळून टाकला, फुटिरतावादाची बिजे असल्याचा विरोधकांचा आरोप
- पब, डिस्को, बार चालतात मग गणेशोत्सव का नाही? आशिष शेलारांचा सवाल
- शरद पवार – उध्दव ठाकरे वर्षावर “सौहार्दपूर्ण” चर्चा; पण विधानसभा अध्यक्ष निवडणूकीत शिवसेना – काँग्रेस यांना एकत्रित धडा शिकविण्याची तयारी…??