जाणून घ्या, काय नाव आहे या दानशूर भक्ताचे?
विशेष प्रतिनिनिधी
तिरुमला : Chennai चेन्नईतील एका भक्ताने तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) ला ६ कोटी रुपये दान केले आहेत. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, भक्त वर्धमान जैन यांनी श्री वेंकटेश्वर भक्ती चॅनल (SVBC) ला ५ कोटी रुपये आणि श्री वेंकटेश्वर गोसमृद्धा ट्रस्टला १ कोटी रुपये देणगी दिली.Chennai
रविवारी रात्री टीटीडीने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, ‘तिरुमला मंदिराच्या रंगनायकुला मंडपममध्ये त्यांनी एसव्हीबीसीसाठी टीटीडीला पाच कोटी रुपयांचे डिमांड ड्राफ्ट आणि एसव्ही गोसमरक्षण ट्रस्टला एक कोटी रुपयांचे डिमांड ड्राफ्ट सुपूर्द केले.’
एसव्हीबीसी हे टीटीडीचे टेलिव्हिजन चॅनेल आहे जे असंख्य भक्तीपर कार्यक्रमांचे प्रसारण करून हिंदू धर्माचा प्रचार करते, तर एसव्ही गोसमरक्षण ट्रस्ट गायींचे संरक्षण करण्यावर आणि तिच्या आध्यात्मिक महत्त्वावर भर देण्यावर लक्ष केंद्रित करते.