• Download App
    पारंपरिक भारतीय बेड म्हणून चारपाईची चक्क ४१,५०० रुपयांना विक्री, न्यूझीलंडच्या वेबसाईटने केला चमत्कार A bed made of traditional Indian bed for Rs 41,500, a miracle performed by a New Zealand website

    पारंपरिक भारतीय बेड म्हणून चारपाईची चक्क ४१,५०० रुपयांना विक्री, न्यूझीलंडच्या वेबसाईटने केला चमत्कार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारताचे अध्यात्मिक आकर्षण असलेल्यांकडून भारतीय वस्तूंना मोठी मागणी असते. याचाच फायदा घेऊन न्यूझीलंडमधील एका वेबसाईटने चारपाईची पारंपरिक भारतीय बेड म्हणून चक्क ४१,५०० रुपयांना विक्री सुरू केली आहे.

    न्यूझीलंडमधील एका फर्निचर ब्रॅण्डने व्हिंजेट प्रोडक्टच्या नावाखाली भारतामध्ये चारपाई नावाने ओळखली जाणारी खाट विक्रीसाठी काढली आहे. अ‍ॅनाबेल्स या फर्निचरच्या दुकानाने  व्हिंटेज इंडियन डेबेडह्  या नावाने ही खाट विकायला काढली आहे. भारतामध्ये चार पायांवर वेल्डींगने जोडलेल्या चौकोनी लोखंडी ढाच्यावर जाड पट्या बांधून तयार केल्या जाणाऱ्या चारपाईवर केवळ एक पांढरी चादर टाकून त्याला आलिशान लूक देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या चारपाईची किंमत ४१,५०० रुपये ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे भारतामध्ये मिळणाऱ्या खाटेच्या किंमतीच्या शंभर पट ही किंमत आहे.

    अ‍ॅनाबेल्स या कंपनीने ही खाट एकदम वेगळी आणि ओरिजनल क्रिएशन असल्याचं सांगत ती ८०० न्यूझीलंड डॉलर्सला म्हणजेच ४१ हजार २११ रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करुन दिली आहे. भारतामध्ये कोणत्याही लोकल बाजारापेठेमध्ये दरामध्ये नीट घासाघीस केल्यास अगदी ४०० रुपयांपासून ही खाट उपलब्ध होते.

    या बेडची किंमत ही १२०० न्यूझीलंड डॉलर्स म्हणजे ६१ हजार रुपये असल्याचं सांगून विशेष सूट म्हणून तो ४१ हजारांना उपलब्ध असल्याचं या वेबसाईटवर दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे न्यूझीलंडमध्ये ४१ हजारांना चारपाई विकणाºया या कंपनीने भारतामधूनच या चारपाई नेल्या आहेत.
    केवळ खाटच नाही तर अनेक गोष्टी या कंपनीने भारतीय बनावटीच्या व्हिंटेज  या नावाखाली विक्रीसाठी ठेवल्या आहेत. त्यांची खरेदीही होत आहे.

    A bed made of traditional Indian bed for Rs 41,500, a miracle performed by a New Zealand website

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या