विशेष प्रतिनिधी
चीन : चीनच्या कम्युनिस्ट सरकारने मुसलमानांची धर्मस्थळे नष्ट केल्यानंतर आता बौद्ध धर्मीयांच्या धर्मस्थळाकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला आहे. नुकताच त्यांनी सुचिआन या प्रांतामध्ये स्थापित 99 फूट उंच गौतम बुद्धांची मूर्ती नष्ट केली आहे. त्याचबरोबर या भागामध्ये असणारे एकूण 45 विशाल प्रार्थना चक्रे देखील हटवले आहेत. त्याचप्रमाणे तिबेटियन लोकांच्या प्रार्थना झेंडे पण जाळून दिलेले आहे.
A 99-foot-tall statue of Gautama Buddha was destroyed in the Chinese province of Suzhou
या घटनेची माहिती मिळताच हिमाचल प्रदेशमध्ये आज संध्याकाळी उशीरा कॅन्डल मोर्चा काढण्यात आला. चीनने केलेल्या कृतीची निंदा केली जात आहे. ही प्रतिमा 2015 साली स्थापित करण्यात आली होती. भविष्यात येणाऱ्या या संकटापासून बुद्ध वाचवतील या श्रद्धेतून ही मूर्ती स्थापन करण्यात आली होती.
चीनने केलेल्या कृत्याचा निषेध करताना निषेध मोर्चामध्ये सामील झालेल्या तिबेटियन लोकांचे म्हणणे आहे की, अशी कृती करून चीनने आमच्या धर्म, भाषा आणि संस्कृतीवर हल्ला केलेला आहे. तिबेटियन लोकांची प्राचीन परंपरा आणि संस्कृतीवर देखील त्यांना हा हल्ला केलेला आहे. प्रार्थना झेंडे देखील जाळले गेले, हीअतिशय दुर्भाग्याची गोष्ट आहे.
मागील महिन्यामध्ये देखील ड्रॅगो येथील मठाची कागदपत्रे नसल्यामुळे आणि जमिनीचा वापर बेकायदेशीररीत्या केल्याच्या आरोपावरून हा मठ देखील पाडण्यात आला होता. तिबेटी शाळादेखील ) उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या. यामुळे 130 विद्यार्थ्यांना शाळांपासून वंचित रहावे लागत आहे.
A 99-foot-tall statue of Gautama Buddha was destroyed in the Chinese province of Suzhou
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींच्या कानपूरमधील सभेत दंगलीचा कट, सीसीटीव्हीमुळे उघड, समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अटक
- पुणे रेल्वे स्थानकावर मास्क न वापरल्याने तब्बल २,७०० जणांवर कारवाई
- ब्रेकिंग : मुंबईतील स्टेट बँक ऑफ इंडियावर गोळीबार
- प्रियांका गांधी म्हणाल्या, देश के लिए मिलकर लढेंगे जितेंगे!!; पण सुनील शास्त्री यांचा प्रतिसाद का नाही??