• Download App
    केवळ २८ तासांत उभारली १० मजली टोलेजंग इमारत;चीनमध्ये तंत्रज्ञान, मनुष्यबळाची कमाल A 10 storey tall building erected in just 28 hours

    केवळ २८ तासांत उभारली १० मजली टोलेजंग इमारत;चीनमध्ये तंत्रज्ञान, मनुष्यबळाची कमाल

    वृत्तसंस्था

    बिजिंग : केवळ २८ तासांत १० मजली टोलेजंग इमारत चीनमध्ये उभारण्यात आली आहे. चीनमध्ये तंत्रज्ञान, मनुष्यबळाची कमाल मानली जाणारी ही वास्तू ठरली आहे. A 10 storey tall building erected in just 28 hours

    घर बांधण्यासाठी आयुष्यभराची जमापुंजी खर्च होते, एखादे घर बांधण्यासाठी २ ते ३ वर्षे सहज निघून जातात. तर इमारतीसाठी ५ ते ७ वर्षे लागतात. मात्र, चीनमध्ये अवघ्या २८ तास ४५ मिनिटात १० मजली टोलेजंग इमारत उभीरली आहे. सोशल मिडियावर हा विषय चर्चेचा ठरला आहे.



    चीनच्या चांग्शामध्ये ब्रॉड ग्रुपद्वारे ही इमारत उभारली आहे. ब्रॉड ग्रुप हा चीनमधील मोठा उद्योगसमूह आहे. कंपनीने या इमारतीच्या निर्माणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. कमी वेळेत इमारत उभी करण्यासाठी इमारतीचे सर्व लहानमोठे भाग आधीच तयार केले. त्यानंतर ते जोडून इमारत उभारली.

    कारखान्यात तयार झालेले हे भाग कंटेनरमधून आणले. त्यानंतर आराखड्याप्रमाणे ते एकावर एक रचत नटबोल्डने जोडले. इमारत पूर्ण झाल्यावर वीज आणि पाणी पुरवठा केला. अशा प्रकारे ही इमारत अवघ्या २८ तास ४५ मिनिटात तयार झाली आहे. इमारत निर्माणाचा ४ मिनिचे ५२ सेंकदांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कमी खर्चात आणि वेळेत ही इमारत उभारण्यात आली.

    A 10 storey tall building erected in just 28 hours

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gaza Food Center : गाझात फूड सेंटरमध्ये चेंगराचेंगरी, 43 ठार; जमावाने 15 जणांना चिरडले; इस्रायली सैन्यावर नरसंहाराचा आरोप

    Trump White House : ट्रम्प व्हाइट हाऊसमध्ये असताना सुरक्षेत त्रुटी, लॉकडाऊन लागू; अज्ञाताने सुरक्षा कुंपणावरून फोन फेकला

    Ukraine : अमेरिकीशी मिनरल डील करणाऱ्या युलिया युक्रेनच्या पीएम होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा पाठिंबा