• Download App
    म्यानमारमध्ये गोळीबारात ८२ जणांचा मृत्यू , लष्करी राजवटीकडून आता रुग्णवाहिकांवरही हल्ले | 82 people killed by military in Myanmar

    म्यानमारमध्ये गोळीबारात ८२ जणांचा मृत्यू , लष्करी राजवटीकडून आता रुग्णवाहिकांवरही हल्ले

    विशेष प्रतिनिधी

    यांगून – म्यानमारमधील लष्करी राजवटीविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एकाच दिवशी ८२ जणांचा मृत्यू झाला. अवघ्या जगातून निषेध होत असताना आंदोलकांवर सर्रास गोळीबार केला जात आहे. गेल्या महिन्यात १४ मार्चला एकाच दिवशी १०९ जणांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. 82 people killed by military in Myanmar

    जखमी होणाऱ्या आंदोलकांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही लष्करशाहीने लक्ष्य केले आहे. आंदोलकांना मदत न करण्याबाबत डॉक्टरांना बजावले जात आहे. तसेच, जखमींना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांवरही सैनिकांनी गोळीबार केल्याच्या घटना घडल्या. अनेक डॉक्टरांना रुग्णालयातूनच पकडून चौकशीसाठी नेले जात असून त्यांच्यावर अत्याचार करून आणि मानसिक छळ करून दुसऱ्या दिवशी सोडून दिले जात आहे.



    लष्कर आणि पोलिस मात्र क्रूरपणे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांचे मृतदेह बौद्ध पॅगोडाच्या आवारात टाकून दिले जात आहेत.

    आंदोलकांना पांगविण्यासाठी बंदुकांबरोबरच रॉकेट लाँचर आणि हातबाँबचाही वापर लष्कराकडून केला जात आहे. बहुतेक आंदोलक अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करत असले तरीही लष्करी अत्याचाराला विरोध म्हणून आंदोलकांमधील काही गटांनी स्वत:ला सशस्त्र केले असून ते पोलिसांच्या दिशेने पेट्रोलबाँबचा मारा करत आहेत.

    82 people killed by military in Myanmar

    Related posts

    France Returns King Toera : फ्रान्सने मादागास्करच्या राजाची कवटी परत केली; 128 वर्षांपूर्वी शिरच्छेद करून फ्रेंच सैनिकांनी नेली होती

    America : अमेरिका रशियासोबत व्यापार करू इच्छिते; बंदी उठवण्याचा विचार; रशियन अणुऊर्जा जहाजे खरेदी करण्याची तयारीही

    Trump : ट्रम्प यांची चीनवर 200% टॅरिफची धमकी; म्हणाले- माझ्याकडे असे कार्ड आहेत, ते उघडले तर चीन नष्ट होईल