विशेष प्रतिनिधी
दुबई : स्थापत्यकलेची अनेक आश्चर्ये असणाऱ्या दुबईच्या शिरपेचात जगातील सर्वांत खोल जलतरण तलावाच्या रुपाने आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ‘डीप डाईव्ह’ नावाच्या या जलतरण तलावाचे नुकतेच उद्घाटन झाले. हा तलाव ६० मीटर खोल आहे60 meter deep swimming pool in Dubai
या तलावात एक कोटी ४० लाख लिटर ताजे पाणी बसू शकते. ते सहा ऑलिंपिक जलतरण तलावाइतके आहे.इतर कोणत्याही जलतरण तलावाच्या तुलनेत या तलावात १५ मीटर अधिक खोल जाता येते. समुद्रकिनारी आढळणाऱ्या शिंपल्याप्रमाणे या जलतरण तलावाची रचना आहे.
संयुक्त अरब अमिरातीची पाण्यात खोलवर जाऊन मोती काढण्याच्या परंपरेला शिंपल्याच्या रचनेतून आदरांजली वाहिली आहे. सर्वाधिक खोल तलाव म्हणून या तलावाची गिनेस बुकमध्येही नोंद झाली आहे.
‘डीप डाईव्ह’ या जलतरण तलावात प्रकाश व संगीताच्या मदतीने टेबल फुटबॉलसारखे पाण्याखालील खेळही खेळता येतात. मनोरंजन व सुरक्षिततेसाठी तलावात ५० कॅमेरेही बसविले आहेत. सर्वसामान्यांसाठी हा तलाव लवकरच खुला होणार आहे.
60 meter deep swimming pool in Dubai
हत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधानांच्या मन की बातने आकाशवाणी करोडपती, प्रक्षेपण सुरू झाल्यापासून ३०.८० कोटी रुपयांची कमाई
- पिगासद्वारे हेरगिरीचे वृत्त देण्यामागची क्रोनाालॉजी समजून घ्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप
- छिंदमने शिवाजी महाराजांबद्दल गलिच्छ भाषा वापरलीच, फॉरेन्सिक लॅबच्या अहवालातून स्पष्ट
- तृणमुल कॉंग्रेसला अखेर झाली उपरती, टाटा समूहाला बंगालमध्ये उद्योग उभारण्यासाठी पायघड्या