या भीषण दुर्घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
विशेष प्रतिनिधी
ढाका : बांगलादेशची राजधानी ढाका येथे गुरुवारी रात्री उशीरा एका सात मजली इमारतीला (बांगलादेश फायर) भीषण आग लागली, ज्यामध्ये सुमारे 43 लोकांचा मृत्यू झाला आणि अनेकजण गंभीर जखमी झाले, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.43 people died in a massive fire in a seven storey building in Bangladesh
बांगलादेशचे आरोग्य मंत्री सामंत लाल सेन यांनी ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आणि जवळच्या बर्न्स हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर वृत्तसंस्थेला सांगितले की, “आगीमुळे आतापर्यंत 43 लोकांचा मृत्यू झाला आहे.” ते म्हणाले की, शहरातील मुख्य बर्न हॉस्पिटलमध्ये सुमारे 40 जखमींवर उपचार सुरू आहेत.
अग्निशमन विभागाचे अधिकारी मोहम्मद शिहाब यांनी सांगितले की, ढाक्यातील बेली रोडवरील एका प्रसिद्ध बिर्याणी रेस्टॉरंटमध्ये गुरुवारी रात्री 9:50 वाजता आग लागली. काही वेळातच आग वरच्या मजल्यापर्यंत पसरली आणि तेथे बरेच लोक अडकले. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणल्याचे त्यांनी सांगितले. अग्निशमन विभागाच्या निवेदनात म्हटले आहे की त्यांनी रेस्टॉरंटमधून 75 लोकांना जिवंत बाहेर काढले आहे.
43 people died in a massive fire in a seven storey building in Bangladesh
महत्वाच्या बातम्या
- गाडी गेली साईडिंगला, “आवतान” घेतले लावून; शिंदे + फडणवीसांवर बारामतीतल्या “मोदी प्रयोगाची” चाहूल!!
- सर्वसामान्यांना मोठा दिलासा, 100 औषधी होणार स्वस्त
- मुख्यमंत्री + दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचे निमंत्रण देऊन पवारांनी “लावून घेतले” बारामतीतल्या शासकीय कार्यक्रमाचे “आवतान”!!
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर, मोदी सरकारने गहू खरेदीबाबत केली ही मोठी घोषणा