वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : किशोरवयीनांच्या मानसिक आरोग्यास नुकसान पोहोचवणारे व त्यांना नादी लावणारे फीचर्स डिझाइन केल्यामुळे सोशल मीडिया दिग्गज ‘मेटा’विरुद्ध ४२ अमेरिकन राज्यांनी आघाडी उघडली आहे. या राज्यांच्या अॅटर्नी जनरलनी मंगळवारी कॅलिफोर्नियाच्या फेडरल कोर्टात खटला दाखल केला आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्राममध्ये डिझाइन केलेले फीचर्स मुले आणि किशोरवयीनांसाठी हानिकारक असल्याचा आरोप मेटावर केला आहे. हे फीचर्स जाणीवपूर्वक मुलांना या प्लॅटफॉर्म्सचा वापर करण्याची सवय लावतात.42 states sue ‘meta’ in US; Allegedly, teenagers are addicted to the platform
कंपनीचा उद्देश केवळ नफा कमावणे आहे, असा आरोप राज्यांनी केला. कमाई वाढवण्यासाठी मेटाने या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या महत्त्वाच्या धोक्यांबाबत लोकांना योग्य माहिती दिलेली नाही. युजर्सची वारंवार दिशाभूल केली जात आहे. कंपनीने तरुण व किशोरवयीनांना प्लॅटफॉर्मवर टिकून राहणे, त्यांना आकर्षित करणे व फसवणुकीसाठी अभूतपूर्व तंत्रज्ञानाचा वापर केला. याचा अल्गोरिदम मुले व किशोरवयीनांना सवय लावणाऱ्या कंटेंटकडे घेऊन जातो. कोर्टात हेही म्हटले आहे की, मेटा आई-वडिलांना न सांगता १३ वर्षांखालील मुलांचा डेटा नियमितपणे गोळा करत आहे. म्हणून अॅटर्नी जनरलने कंपनीवर चिल्ड्रन ऑनलाइन प्रायव्हसी प्रोटेक्शन ॲक्टचे उल्लंघन केल्याचा आरोपही केला आहे. यात म्हटले की, किशोरवयीन मुलांचा मेंदू संवेदनशील असतो हे माहीत असूनही सोशल मीडियावर त्यांनी जास्तीत जास्त वेळ घालवावा, हाच प्रयत्न मेटाने केला आहे. तथापि, आमचे प्लॅटफॉर्म्स नुकसान पोहोचवणारे नाही, असेच मेटाने सार्वजनिकरीत्या म्हटले आहे.
संशोधनाचा हवाला देत कॅलिफोर्निया आणि इलिनॉयने तक्रारीत म्हटले की, मेटाच्या प्लॅटफॉर्म्सचा वापर करणारे किशोरवयीन नैराश्य व अनिद्रेचा सामना करत आहेत. याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावरही होत आहे. त्यांच्या मनात नकारात्मकता घर करत आहे.
42 states sue ‘meta’ in US; Allegedly, teenagers are addicted to the platform
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : भारताचा ड्रीम प्रोजेक्ट IMEEC ला सुरुवात, चीनच्या BRI ला देणार टक्कर, वाचा सविस्तर
- गाझाचा दावा, इस्रायली हल्ल्यात ७०० पॅलेस्टिनी एका रात्रीत मारले गेले!
- उद्धव ठाकरेंकडून जरांगे पाटलांचे कौतुक, तर छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होत मराठा आरक्षणाचे मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन
- अनेक वर्षानंतर अभिनेता भरत जाधव यांचा रंगभूमीवर होणार आगमनं! वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला.