• Download App
    इस्रायली राखीव दलाची 30000 फौज गाझात घुसली 30,000 Israeli reserve forces enter Gaza; 1600 Hamas terrorists killed

    इस्रायली राखीव दलाची 30000 फौज गाझात घुसली; हमासचे 1600 दहशतवादी ठार!!; पिढ्यानपिढ्या लक्षात ठेवतील असा बदला घेण्याच्या इस्रायली पंतप्रधानांचा इशारा

    वृत्तसंस्था

    तेल अविव : इस्रायलच्या राखीव दलाची तब्बल 30000 फौज गाझा पट्टीत घुसली असून त्यांनी दहशतवाद्यांनी आत्तापर्यंत कब्जा केलेली इस्रायलची 22 गावे पुन्हा सोडवून घेतली आहेत. हमासच्या तब्बल 1600 दहशतवाद्यांना त्यांनी समोरासमोरच्या लढाईत मारले आहे. हमासने इस्रायल वरचे हल्ले वाढवण्याची धमकी देताच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी देखील हमासला तेवढाच गंभीर इशारा दिला आहे. पॅलेस्टेनींच्या पुढच्या अनेक पिढ्या लक्षात ठेवतील असा बदला घेऊ, असा इशारा नेत्यानाहू यांनी दिला आहे. 30,000 Israeli reserve forces enter Gaza; 1600 Hamas terrorists killed

    इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा आज चौथा दिवस आहे. टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, इस्रायली लष्कराने गाझा सीमेवर पुन्हा ताबा मिळविल्याचे जाहीर केले आहे. गाझामधील 200 ठिकाणांना एका रात्रीत लक्ष्य केल्याचे लष्कराने सांगितले. युद्धात आतापर्यंत सुमारे 123 इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

    दुसरीकडे, युद्धाच्या दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, हमासने आमच्यावर हल्ला करून सर्वात मोठी चूक केली आहे. हमास आणि इस्रायलच्या इतर शत्रूंच्या अनेक पिढ्या अनेक दशकांपर्यंत लक्षात ठेवतील अशी किंमत आम्ही निश्चित वसूल करू!!

    पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले, आम्हाला युद्ध नको होते. हे आमच्यावर अतिशय क्रूर पद्धतीने लादण्यात आले. आम्ही युद्ध सुरू केले नसेल, परंतु आम्ही ते संपवू. इस्रायल केवळ आपल्या लोकांसाठी नाही तर इस्लामी दहशतवादा विरोधात उभ्या असलेल्या प्रत्येक देशासाठी लढत आहे.

    7 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या युद्धात आतापर्यंत एकूण 1587 लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलमध्ये 900 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 2300 लोक जखमी झाले आहेत. त्याचवेळी गाझा पट्टीमध्ये 140 मुलांसह 687 पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. तर 3,726 लोक जखमी झाले आहेत.

    इस्रायलने गाझामधील हमासच्या ठाण्यांवर सातत्याने हल्ले केले. हे फुटेज इस्रायल डिफेन्स फोर्सने शेअर केले.

    9 ऑक्टोबर रोजी इस्रायली सरकारने आपल्या सैन्याला संपूर्ण गाझा पट्टी ताब्यात घेण्याचे आदेश दिले. इस्रायलने गाझा सीमेवर 100000 सैनिक तैनात केले आहेत. तसेच 300000 सैनिकांना तयार राहण्यास सांगितले आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनीही गाझा पट्टीला अन्न, पाणी, वीज आणि इंधनाचा पुरवठा थांबवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

    इस्रायलमध्ये मरण पावलेल्या अमेरिकन नागरिकांची संख्या 11 वर पोहोचली आहे. त्याचवेळी 10 ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याआधी फ्रान्स, जर्मनी आणि युक्रेननेही हमासच्या हल्ल्यात आपल्या नागरिकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली होती. मात्र, लष्कराने सीमेवरील इस्रायलचे भाग हमासकडून मुक्त केले आहेत. इस्रायलच्या हवाई दलाने हमास आणि पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादच्या 500 वॉर रूम्स एका रात्रीत नष्ट केल्या.

    हिजबुल्लाची अमेरिकेला धमकी

    लेबनीज दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने अमेरिकेला धमकी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे- जर अमेरिकेने युद्धात थेट हस्तक्षेप केला तर ते मध्य पूर्वेतील अमेरिकन तळांवर हल्ला करतील. पॅलेस्टाईन हे युक्रेन नाही.

    130 लोकांचे अपहरण केल्याचा दावा हमासने केला आहे. त्यांना गाझा पट्टीतील बोगद्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. तो या ओलिसांचा मानवी ढाल म्हणून वापर करेल, जेणेकरून इस्रायलने हल्ला केला तर त्याचेच लोक मारले जातील. इस्रायलच्या संरक्षण दलाने सांगितले की, ओलीस ठेवलेल्यांमध्ये महिला, मुले आणि कुटुंबांचा समावेश आहे.

    अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन म्हणाले, आमची जहाजे आणि लढाऊ विमाने मदतीसाठी इस्रायलच्या दिशेने जात आहेत. आम्ही यूएसएस गेराल्ड आर फोर्ड विमानवाहू नौकेला (युद्धनौका) सतर्क केले आहे.

    इस्रायलचे कर्नल रिचर्ड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, हमासचे लढवय्ये अजूनही इस्रायलमध्ये घुसत आहेत. ट्रॅक्टरवर घुसलेल्या एका सैनिकाला इस्रायली सैनिकांनी ठार केले.

    इस्रायलमध्ये 18000 भारतीय सुरक्षित

    तेल अवीवमधील भारतीय दूतावासानुसार, इस्रायलमध्ये 18,000 भारतीय राहतात. सध्या सर्वजण सुरक्षित आहेत. इस्रायलमध्ये पोहोचलेल्या भारतीय पर्यटकांनी दूतावासाला सुरक्षित बाहेर काढण्याचे आवाहन केले आहे.

    ‘अल-अक्सा फ्लड’

    हमासने इस्रायलविरुद्धच्या हल्ल्यांना ‘अल-अक्सा फ्लड’ असे नाव दिले आहे. त्याचवेळी इस्रायलच्या लष्कराने हमासच्या विरोधात ‘सोर्ड्स ऑफ आयर्न’ ऑपरेशन सुरू केले आहे.

    इस्रायलने जेरुसलेममधील अल-अक्सा मशिदीच्या अपवित्रतेचा बदला म्हणून हा हल्ला केला आहे, असे हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद डेफ यांनी शनिवारी म्हटले होते. वास्तविक, इस्रायली पोलिसांनी एप्रिल 2023 मध्ये अल-अक्सा मशिदीवर ग्रेनेड फेकले होते.

    30,000 Israeli reserve forces enter Gaza; 1600 Hamas terrorists killed

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार