विशेष प्रतिनिधी
जिनेव्हा – जगभरात गेल्या चोवीस तासात २५ लाख जणांना कोरोनाची लागण झाली. अमेरिकेत २,५५६,६९० रुग्ण आढळून आले असून ही ९२ टक्के वाढ आहे. ब्रिटनमध्ये १,१०४,३१६ नवीन रुग्ण आढळून आले असून ही वाढ ५१ टक्के आहे. भारतात १०२,३३० नवीन रुग्ण आढळून आले असून ही १२० टक्के वाढ आहे.25 lack peoples affected in last 24 hours
ओमिक्रॉन हा लस घेतलेल्या नागरिकांना डेल्टाच्या तुलनेत कमी धोकादायक ठरत आहे. अनेक देशात डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉन वेगाने पसरत आहे. कोरोना संसर्गाची ही सुनामी व्यापक आणि वेगवान असून जगभरातील आरोग्य यंत्रणांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ओमिक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टाच्या तुलनेत गंभीर नसल्याचे जाणवत असले तरी सौम्य रूपाने त्याकडे पाहू नये. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले की, अन्य देशात पसरणाऱ्या संसर्गाशी तुलना केल्यास अमेरिकेत सर्वाधिक वाढ नोंदली गेली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे अध्य़क्ष ट्रेडेस घेब्रेयेसस यांनी म्हटले की, पहिल्या पिढीचे लसीकरण संसर्गाच्या सर्व व्हेरिएंटला रोखू शकत नाही. परंतु रुग्णालयात दाखल होणे आणि संसर्गामुळे होणारे मृत्यू याचे प्रमाण कमी करण्यास उपयुक्त आहे.
25 lack peoples affected in last 24 hours
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाचा संसंर्ग असूनही भाऊ खुलेआम फिरत असल्याने ममता बॅनर्जी संतप्त
- इटलीतून आलेल्या १९० प्रवाशांना कोरोना, अमृतसर विमानतळावर गोंधळ; दुसरी धक्कादायक घटना
- नागपुरात संघ मुख्यालयासह अन्य ठिकाणांची जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांकडून रेकी
- RECORD VACCINATION : भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ! एक वर्ष-150 कोटी लसीकरण!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं अभिनंदन…