विशेष प्रतिनिधी
बर्लिन – युरोपच्या पश्चिूम भागात आलेल्या पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २०० झाली आहे. जर्मनीमध्ये पाऊस थांबला असला तरी बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडत आहे. ऑस्ट्रियामधील काही गावांमध्येही पावसामुळे नुकसान झाले आहे. 200 died in Europe flood
पुराचे पाणी ओसरत असले तरी पाण्याबरोबर वाहून आलेला गाळ आणि इतर कचरा दूर करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. अनेक रस्त्यांवर चिखलात रुतलेल्या चारचाकी गाड्या, घरगुती साहित्य, पडलेली झाडे यांचे साम्राज्य आहे.
पूराचा सर्वाधिक फटका पश्चिाम जर्मनीतील ऱ्हाइनलँड-पॅलाटिनेट राज्याला बसला असून येथे ११० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या राज्याशेजारील उत्तर ऱ्हाइन-वेस्टफालिया राज्यात पुरामुळे ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. बेल्जियममध्येही पुराच्या तडाख्यात २७ जणांना जीव गमवावा लागला आहे. पुरामुळे झालेल्या आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी ३६ कोटी डॉलर आवश्यलक असल्याचे जर्मनीचे अर्थमंत्री ओलाफ स्कोल्झ यांनी सांगितले. सरकारकडून मदतीबाबतचा निर्णय दोन ते तीन दिवसांत अपेक्षित आहे.
200 died in Europe flood
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचे गिफ्ट, DA 11% वाढून 28% केला, जाणून घ्या सॅलरी आणि पेन्शनमध्ये किती होणार वाढ
- फादर स्टॅन स्वामींना पद्म पुरस्कार देण्यात यावा, काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांचे ट्वीट
- Patanjali Research Trust : बाबा रामदेवांच्या पतंजली रिसर्च फाउंडेशनला दान दिल्यास टॅक्समध्ये मिळेल पाच वर्षांसाठी सूट
- गोव्यातही 300 युनिट मोफत वीज देणार केजरीवाल, सत्ता आल्यास जुने वीजबिल माफ करण्याचे आश्वासन
- Maha Electric Vehicle Policy : महाराष्ट्रात विद्युत वाहन धोरण जाहीर, काय आहेत तरतुदी, वाचा सविस्तर