• Download App
    बांगलादेशात 14 हिंदू मंदिरे पाडली, मूर्तींची नासधूस; हिंदू समाज संतप्त 14 Hindu temples demolished in Bangladesh, idols destroyed; Hindu society is angry

    बांगलादेशात 14 हिंदू मंदिरे पाडली, मूर्तींची नासधूस; हिंदू समाज संतप्त

    वृत्तसंस्था

    ढाका : बांगलादेशमध्ये ठाकूरगावातील बालियाडांगीमध्ये अज्ञात समाजकंटकांनी हिंदू मंदिरांवर हल्ला केला आहे. 14 मंदिरांवर हा हल्ला केला असून, मंदिरातील सर्व मूर्तींची तोडफोड करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अज्ञातांनी अंधाराचा फायदा घेत 14 मंदिरे पाडली. त्यातील मूर्तींची नासधूस केली आहे, अशी माहिती बालियाडांगी येथील हिंदू समाजाचे नेते बैद्यनाथ बर्मन यांनी दिली आहे. 14 Hindu temples demolished in Bangladesh, idols destroyed; Hindu society is angry

    ठाकूरगाव बालियाडांगी उपजिल्हा पूजा सेलिब्रेशन काऊन्सिलचे सरचिटणीस बर्मन यांनी सांगितले की, काही मूर्ती पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. तर काही मूर्ती मंदिराच्या ठिकाणी तलावात फेकून देण्यात आल्या होत्या. यामागे नेमके कोण आहे हे अद्याप उघड झालेले नाही. परंतु तपास पूर्ण करत आरोपींना पकडले जावे आणि हिंदू समाजाला न्याय मिळावा, अशी मागणी बर्मन यांनी केली आहे.

    देशातील शांतता बिघडवण्यासाठी हल्ला

    हिंदू समाजाचे नेते आणि युनिअन परिषदेचे चेअरमन समर चॅटर्जी यांनी सांगितले की, हा परिसर नेहमीच आपल्या जातीय सलोख्यासाठी ओळखला जातो. याआधी अशी कोणतीही निंदनीय घटना घडलेली नाही. या ठिकाणी मुस्लिम समाज बहुसंख्यांक असून, त्यांचा हिंदूंसह कोणताही वाद नाही. यामागे नेमके आरोपी कोण आहेत?, हे आम्हालाही समजत नाही आहे, असे ते म्हणाले आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आणि रविवारदरम्यान हे हल्ले झाले आहेत. ठाकूर गावचे पोलीस प्रमुख जहांगीर हुसैन यांनी एका मंदिराच्या ठिकाणी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, देशातील शांतता बिघडवण्यााठी हा आकस्मिक हल्ला केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. पण गुन्हेगारांना पकडून शिक्षा करू.

    14 Hindu temples demolished in Bangladesh, idols destroyed; Hindu society is angry

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Canada : कॅनडात मंदिराच्या भिंतीवर लिहिल्या खलिस्तानी घोषणा; नगर कीर्तनापूर्वी कारवाई

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!