वृत्तसंस्था
तेहरान : इराकमध्ये बुधवारी एका मॅरेज हॉलला लागलेल्या आगीत 100 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात दीडशेहून अधिक जण जखमी झाले आहेत. या अपघातात वधू-वरही जखमी झाले आहेत.100 killed in marriage hall fire in Iraq; More than 150 injured
एका अधिकाऱ्याने सांगितले की, इराकच्या निनेवेह प्रांतातील हमदानिया भागात ही आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, फटाक्यांच्या आतषबाजीनंतर मॅरेज हॉलला आग लागल्याचे काही मीडिया रिपोर्ट्स सांगत आहेत. आग लागली तेव्हा सुमारे 1,000 लोक येथे उपस्थित होते.
बचाव पथक घटनास्थळी पोहोचले
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. लग्नमंडप पूर्णपणे मोडकळीस आला आहे. रेस्क्यू टीम येथून मृतदेह बाहेर काढत आहे.
इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी यांनी अधिकाऱ्यांना लोकांना लवकरात लवकर मदत देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जुलै 2021 मध्ये कोविड रुग्णालयात 58 जणांचा मृत्यू झाला
13 जुलै 2021 रोजी इराकच्या दक्षिणेकडील शहर नसिरिया येथील अल-हुसेन कोविड हॉस्पिटलमध्ये आग लागली. यामध्ये 2 आरोग्य कर्मचाऱ्यांसह 58 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. कोविड वॉर्डमधील ऑक्सिजन टाकीमध्ये स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. मृतांचे दफन इराकमधील नजफ येथे करण्यात आले होते.
या अपघातानंतर पंतप्रधान मुस्तफा अल-कादिमी यांनी वरिष्ठ मंत्र्यांची बैठक बोलावली होती. यामध्ये नसिरिया रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थापकांना निलंबित करून अटक करण्याचे आदेश देण्यात आले होते.
एप्रिल 2021 मध्ये कोरोना हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत 82 जणांचा मृत्यू झाला
एप्रिल 2021 मध्ये, बगदाद, इराकमधील कोविड हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत 82 लोकांचा मृत्यू झाला होता. या अपघातात 100 हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. याठिकाणी अचानक शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितले होते. आगीमुळे जवळच ठेवलेली ऑक्सिजन टाकी फुटली आणि आग संपूर्ण हॉस्पिटलमध्ये पसरली होती.
100 killed in marriage hall fire in Iraq; More than 150 injured
महत्वाच्या बातम्या
- ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर!
- गरवारे क्लब निवडणुकीत शरद पवार पॅनलचा धुव्वा; राष्ट्रवादी फुटीपाठोपाठ संस्थागत राजकारणातही पवारांची मोठी पीछेहाट!!
- भाजपची करा शितावरून भाताची परीक्षा; पण घराणेशाही नेत्यांची घरातल्याच भाकऱ्या फिरवण्याची आहे का क्षमता??
- भाजपा नेते शाहनवाज हुसैन यांना हृदयविकाराचा झटका, मुंबईच्या रुग्णालयात दाखल