• Download App
    अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कोविड प्रतिबंधक लस हाच उतारा - सीतारामन |Vaccination is important for economy

    अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कोविड प्रतिबंधक लस हाच उतारा – सीतारामन

    विशेष प्रतिनिधी

    तुतिकोरीन – अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कोविड प्रतिबंधक लस हाच उतारा आहे, असे केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.त्या म्हणाल्या की लशीमुळे उद्योगपती नियमित व्यवसाय करू शकत आहेत. व्यापाऱ्यांना माल मिळतो आहे.Vaccination is important for economy

    शेतकरी शेतीची कामे पार पाडत आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते आहे. देशात आतापर्यंत ७३ कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. देशातील लसीकरण मोहीम सुरळीतपणे सुरु आहे.



    कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अर्थ मंत्रालयाने सुरु केलेल्या योजनांचा त्यांनी उल्लेख केला. त्या म्हणाल्या की, आपली सारी प्रार्थना तिसरी लाट येऊ नये म्हणूनच आहे, पण ती आली तर रुग्णालये आहेत का याचा विचार करावा लागेल.

    रुग्णालये असतील तर तेथे अतिदक्षता विभाग आहे का, तो असल्यास ऑक्सिजन आहे का हे प्रश्न असतात. दुसऱ्या लाटेचा मोठा परिणाम होत असताना अशा साऱ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी आमच्या मंत्रालयाने सुरु केलेल्या योजनांमुळे रुग्णालये सुसज्ज होत आहेत. ग्रामीण भागातील रुग्णालयांनाही विस्तारीकरण करणे शक्य झाले.

    Vaccination is important for economy

    महत्त्वाच्या बातम्या.

    Related posts

    Former Federal Reserve : माजी फेडरल रिझर्व्ह गव्हर्नरने ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केला; लिसा कुक यांना 3 दिवसांपूर्वी काढून टाकले

    France Returns King Toera : फ्रान्सने मादागास्करच्या राजाची कवटी परत केली; 128 वर्षांपूर्वी शिरच्छेद करून फ्रेंच सैनिकांनी नेली होती

    America : अमेरिका रशियासोबत व्यापार करू इच्छिते; बंदी उठवण्याचा विचार; रशियन अणुऊर्जा जहाजे खरेदी करण्याची तयारीही