विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महात्मा गांधी यांच्या चले जाव घोषणेने तमाम भारतीयांमध्ये स्फुलिंग संचारला. इन्क्लाब जिंदाबाद म्हणत फासावर गेलेल्या हजारो क्रांतिकारकानी लाखो तरुणांच्या मनात देशभक्तीची ज्वाला पेटविली असेल तर रविवारचा दिवस जनता कर्फ्युची घोषणा करून गर्दी टाळण्याचे आवाहन देशवासियांना करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी निश्चितच यशस्वी होतील असा विश्वास सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.
पंतप्रधानांनी देशाला उद्देशून भाषण केले आणि सोशल मीडियावर त्याला प्रतिसाद मिळू लागला. मात्र त्याचबरोबर काही जणांनी मोदी यांच्या घोषणेची खिल्ली उडवली. प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठी याने मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन तृडो यांचे व्हिडीओ ट्विट करून पहा दोन पंतप्रधानांमधील फरक, असे म्हणत टीका केली. यावरून नेटकऱ्यांनी राठी यांना चांगलेच ट्रोल केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी देशाला कोरोनाच्या गंभीरतेची जाणीव भारतीयांना करून दिली आहे. त्याचबरोबर देशवासियांमध्ये विश्वासाची भावना निर्माण केली आहे. अमेरिकेत सध्या लोकांमध्ये प्रचंड धास्ती आहे. लोक अगदी टॉयलेट पेपरचाही साठा करून ठेऊ लागल्याने इतरांना मिळणे अवघड झाले आहे. मानसिक ताण आल्याने लोक सैरभैर झाले आहेत. कोणीही नेता त्यांना समजावू शकत नाही. मात्र मोदींनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्यात विश्वास निर्माण केला आहे, अशा प्रतिक्रिया लोक व्यक्त करत आहेत.
भारत पाकिस्तानमधील 1965 च्या युद्धाच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी देशवासियांना दर सोमवारी उपवास करण्याचे आवाहन केले होते. यामुळे अन्न धान्याचे दुर्भिक्ष्य लगेच कमी झाले नाही पण त्याची गंभीरता लोकांना समजली. मोदी यांच्या घोषणेकडे याच पद्धतीने पाहायला हवे. यातून लोकांमध्ये कोरोना विरुद्ध लढण्याची जिद्द निर्माण होईल अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात इतरही अनेक मुद्दे सांगितले. देशाच्या सर्वोच्च नेत्याने हे सांगणे गरजेचे होते. त म्हणतात, प्रत्येक भारतीयाने सर्तक असले पाहिजे. गरज असेल तरच बाहेर पडा, अन्यथा घराबाहेर जाणे टाळा. वयाच्या साठी ओलांडलेल्यांनी घरातच रहावे. नेहमीच्या चेकअपसाठी रुग्णालयात जाणे टाळा. शस्त्रक्रिया पुढे ढकलणे शक्यत असेल तर तसे करा. तुमच्या घरी काम करणारा आला नाही म्हणून त्यांचे वेतन कापू नका, तुमचे कर्मचारी, ड्रायव्हर यांना मदत करा. साठेबाजी करु नका, जीवनावश्यक वस्तुंची कमतरता निर्माण होणार नाही.
तु्म्हाला असे वाटते की, तुम्हाला काही होणार नाही. तुम्ही बाहेर फिरत राहणार तर तुमची विचार करण्याची पद्धत चुकीची आहे. तुम्ही स्वत:ला आणि तुमच्या प्रियजनांना संकटात टाकत आहात. तुम्ही गर्दी टाळली पाहिजे. आवश्यकता असेल तरच बाहेर पडा. भारतावर करोना व्हायरसच्या संकटाचा प्रभाव पडणार नाही असे मानणे चुकीचे आहे. १३० कोटी देशवासियांना संयम आणि संकल्प अधिक दृढ करण्याची गरज आहे. करोनाला रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशाने पालन केले पाहिजे.
मात्र हे सर्व सोडून २२ मार्चला रविवारी सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत घराबाहेर पडू नका. जनता कर्फ्यू पाळा.
हॉस्पिटल, विमानतळावर आज लाखो लोक सेवा बजावत आहेत. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता हे काम ते करत आहेत. त्यांना करोनाची बाधा होण्याची जास्त शक्यता असूनही ते हे काम करत आहेत. व्हायरस आणि देश यामध्ये ते आपले रक्षणकर्ते आहेत अशा लोकांप्रती कृतज्ञता म्हणून २२ मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता लोकांनी दरवाजे उघडून, खिडकीमध्ये उभे राहून त्या सर्वांचे घंटी, थाळी आणि टाळया वाजवून कृतज्ञतेची भावना व्यक्त करावी या एकाच मुद्यावर टीका करणे योग्य नाही असेही नेटकरी म्हणत आहेत.