कोरोना व्हायरसमुळे कराव्या लागलेल्या लॉक डाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून सावरण्यासाठी केंद्र सरकारतर्फे देशातील १० कोटी गरीबांच्या खात्यात थेट पैसे टाकण्याचा विचार सुरू आहे. दीड लाख कोटी ते २ लाख ३० हजार कोटी रुपयांचे हे पॅकेज असून पुढील आठवड्यात त्याची घोषणा होणार आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे कराव्या लागलेल्या लॉक डाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून सावरण्यासाठी केंद्र सरकारतर्फे देशातील १० कोटी गरीबांच्या खात्यात थेट पैसे टाकण्याचा विचार सुरू आहे. दीड लाख कोटी ते २ लाख ३० हजार कोटी रुपयांचे हे पॅकेज असून पुढील आठवड्यात त्याची घोषणा होणार आहे.
जगभरात कोरोना व्हायरसचा उद्रेक सुरू आहे. हजारो लोक मृत्यूमुखी पडले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉक डाऊन घोषित केला आहे. मात्र, यामुळे हातावर पोट असणाºयांचे प्रचंड हाल होणार आहेत. त्यासाठीच केंद्र सरकारकडून थेट मदतीसाठी विचार सुरू आहे. रॉयटरने सुत्रांच्या हवाल्यानुसार दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वृध्दीेला प्रोत्साहनासाठी पॅकेज देण्याचा विचार करत आहे.
केंद्र सरकारने या पॅकेजबाबत अद्याप ठोस निर्णय घेतला नसला तरी पंतप्रधान कार्यालय, अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडिया यांच्यात चर्चा सुरू आहे.
गरीबांच्या खात्यात थेट पैसे टाकण्याबरोबरच अडचणीत सापडलेल्या उद्योगांना वाचविण्यासाठीही या निधीचा उपयोग होणार आहे. १३० कोटी लोकसंख्येच्या देशात बुधवारपासून संपूर्ण लॉक डाऊन झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.

केंद्र सरकार यासाठी कर्ज वाढवून घेण्याचाही विचार करत आहेत. यासाठी रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियाकडून बॉँडसही काढले जाण्याची शक्यता आहे. जगातील अनेक देशांनी कोरोना विरुध्दच्या उपाययोजनांसाठी अशा प्रकारचे बॉँड काढले आहे.
राज्य सरकारेही आर्थिक संकटात सापडली आहेत. यासाठी रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियाकडून त्यांना ओव्हरड्रॉफ्ट सुविधा दिली जाण्याचीही शक्यता आहे.
कोरोना विरुध्दच्या लढाईत अर्थव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मंगळवारी केंद्र सरकारकडून पॅकेज घोषित केले जाईल, असे संकेत दिले होते. करपरतावा भरण्यास मुदतवाढ, दिवाळखोरीच्या प्रक्रियेत बदल यासारख्या उपाययोजना केल्या जात आहेत.