• Download App
    जगप्रसिद्ध बॉक्सिंग चॅम्पियन 'माईक टायसन' झळकणार विजय देवरकोंडाच्या लायगर सिनेमात? | World famous boxing champion Mike Tyson will star in vijay deverakonda's much awaited liger movie

    जगप्रसिद्ध बॉक्सिंग चॅम्पियन ‘माईक टायसन’ झळकणार विजय देवरकोंडाच्या लायगर सिनेमात?

    विशेष प्रतिनिधी

    हैद्राबाद : अर्जुन रेड्डी फेम अभिनेता विजय देवरकोंडा करण जोहरच्या लायगर या सिनेमामध्ये झळकणार आहे. या सिनेमामध्ये त्याच्या सोबत अनन्या पांडे काम करताना दिसणार आहे. पुरी जगन्नाथ यांच्या ह्या सिनेमा बद्दल नुकताच एक अपडेट करण जोहरने आणि विजय देवरकोंडाने आपल्या ऑफीशियल इन्स्टाग्राम आणि ट्विटर पेजवर शेअर केले आहे.

    World famous boxing champion Mike Tyson will star in vijay deverakonda’s much awaited liger movie

    जगप्रसिद्ध बॉक्सिंग चॅम्पियन माईक टायसन लायगर या सिनेमामध्ये एक कॅमिओ रोल करताना दिसून येणार आहेत. करण जोहरने यासंबंधीची माहिती आपल्या ट्विटर अकाउंटवर देताना लिहीले आहे, भारतीय इतिहासाच्या सिनेमात किंग ऑफ द रिंग प्रथमच एका चित्रपटामध्ये दिसून येतील. असे लिहून त्यांने माईक टायसन यांचे लायगर टीममध्ये स्वागत केले आहे.


    करण जोहर म्हणाला, माझी आई एक ‘सुपरहिरो’, आठ महिन्यांत झाल्या दोन शस्त्रक्रिया!


    तर विजय देवरकोंडाने देखील ही बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना लिहिले आहे की, “We promised you madness and We are just getting started. for the 1st time on indian screens. joining over mass spectacle – #linger the baddest man on the planet the god of boxing the legend, the beast, the greatest of all time! IRON MIKE TYSON”

    पुरी जगन्नाथ यांच्या या सिनेमाचे निर्माते करण जोहर, अपूर्व मेहता आहेत. धर्मा प्रॉडक्शन या बॅनरखाली हा सिनेमा बनवला जात आहे  तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. आगामी काळामध्ये विजय देवरकोंडा शिवा निर्वाणा आणि सुकुमार ह्या मोठ्या दिग्दर्शकांसोबत काम करता दिसून येईल.

    World famous boxing champion Mike Tyson will star in vijay deverakonda’s much awaited liger movie

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी