विशेष प्रतिनिधी
मुंबई : आर माधवन आणि सुरवीन चावला यांची प्रमुख भूमिका असणारा असणारी डीकपल्स ही सीरिज नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. या सीरिजने प्रदर्शनानंतर लोकांचा चांगला प्रतिसाद मिळवला आहे. याच सीरिज मधला एक सीन मात्र सध्या इंटरनेटवर अतिशय व्हायरल होत आहे.
Why did R Madhavan start chanting Gayatri Mantra when man, who was reading Namaz complained
या सीरीजमध्ये आर माधवनने एका लेखकाची भूमिका केलेली आहे. त्याला पाठदुखीचा त्रास असतो. त्यामुळे जिथेही त्याला मोकळी जागा दिसते तो व्यायाम करण्यासाठी तिथे जात असतो. एके दिवशी तो विमानतळावर जातो आणि त्याला अचानक पाठदुखीचा त्रास सुरू होतो. विमानतळावर प्रार्थना करण्यासाठी प्रार्थना कक्ष एक वेगळा असतो. हे त्याच्या लक्षात आल्यानंतर तो तिथे जातो.
तो तिथे गेल्यानंतर पाहतो तर एक माणूस येथे आधीच नमाज पडत असतो. शेजारी तो आपला व्यायाम करायला चालू करतो. नमाज पडणाऱ्या व्यक्तीला मात्र त्याचा राग येतो आणि तो त्याला म्हणतो की, तू इथे व्यायाम करु शकत नाहीस. हे प्रार्थना कक्ष आहे. आर माधवन त्याला सांगतो की मला पाठदुखीचा त्रास आहे. मला व्यायाम करणे अतिशय गरजेचे आहे.
Netflix : आता मित्रांना पासवर्ड शेअर करणे होईल कठीण, व्हेरिकेशन होणार अनिवार्य
तो नमाज पडणारा व्यक्ती त्याचं काही केल्या ऐकत नाही. शेवटी तिथे विमानतळावरील अधिकारी येतात. ते विमान अधिकारीदेखील हेच सांगतात की प्रार्थना कक्षामध्ये तुम्ही व्यायाम करु शकत नाही. मग आता ह्यातून मार्ग कसा काढायचा? ह्या विचारात असताना आर माधवन ला एक स्मार्ट आयडिया सुचते. अतिशय स्मार्टली तो व्यायामाच्या पोझिशनमध्ये गायत्री मंत्र म्हणायला चालू करतो. त्याने गायत्री मंत्र म्हणण्यास चालू केल्यावर तो अधिकरी त्याच्या त्याच्या कामाला लागतो आणि हा नमाज पडणारा व्यक्ती देखील काही बोलत नाही. हा सीन सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
या व्हिडिओवर बऱ्याच लोकांच्या मिक्स प्रतिक्रिया आलेल्या आहेत. काही लोकांनी हा व्हिडिओ एक विनोदी व्हिडिओ म्हणून पाहिलेला आहे. तर बऱ्याच लोकांनी या व्हिडिओमधील नेमका अर्थ उचलून यावर टीका मात्र केलेली आहे असे दिसते. बऱ्याच लोकांचे असे म्हणणे आहे की, आपण अशा देशात राहतो जिथे माणसापेक्षा धर्म प्रार्थना महत्त्वाचे असते.
Why did R Madhavan start chanting Gayatri Mantra when man, who was reading Namaz complained
महत्त्वाच्या बातम्या
- Election : राज्यातील 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींसाठी मतदान सुरू, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, वाचा सविस्तर
- पंजाबमध्ये विरोधकांचा भाजपमध्ये जंबो प्रवेश; वीस माजी मंत्री, खासदारासह आमदारांचा प्रवेश
- पुणे : महापालिकेच्या तब्बल १८ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले ; वेतनाची बिले तयार करण्यासाठी २० अतिरिक्त कर्मचारी नियुक्त
- IMPORTANT NEWS : म्हाडाची ऑनलाईन परीक्षा फेब्रुवारीत होणार ;वाचा सविस्तर