विशेष प्रतिनिधी
दिल्ली : देसी गर्ल प्रियांका चोप्राने क्वांटिको या सिरीज मधून हॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. क्वांटिको या सीरिजचे दोन सिझन देखील प्रदर्शित झाले होते. त्यानंतर ती बऱ्याच हॉलीवूड सिनेमांमध्ये दिसली होती. नुकताच 18 वर्षांनी रिलीज झालेला मॅट्रिक्सचा पुढचा भाग द मॅट्रिक्स रिसरेक्शन हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
Why are netizens trolling Priyanka Chopra?
या चित्रपटामध्ये प्रियांकाने सती हे कॅरेक्टर प्ले केले आहे. या चित्रपटामध्ये तिचा 8 ते 10 मिनिटांचा रोल आहे. पण असे असले तरीसुद्धा तो मॅट्रिक सिनेमा आहे. त्यामुळे या सिनेमातील 5 मिनिटांचा रोल देखील एक अतिशय मोठी गोष्ट आहे. तरीदेखील प्रियांका चोप्राला बरेच लोक ट्विटरवर ट्रोल करताना दिसून येत आहेत.
मॅट्रिक्स सिनेमातील माझा रोल छोटा असला तरी महत्वाचा आहे ; देसी गर्ल प्रियांका चोप्रा
बऱ्याच लोकांनी या तिच्या रोलची तुलना 83 सिनेमातील दीपिका पदुकोणच्या रोलसोबत केली आहे. दीपिका 83 मध्ये क्रिकेटर म्हणून सुद्धा नाही, तरीसुद्धा तिला 10 मिनिटांपेक्षा जास्त स्क्रीन टाईम 83 मध्ये मिळाला आहे, असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.
तर या सर्व टीकेनंतर प्रियांका चोप्राच्या आईने एका बॉली हंगामाच्या ट्वीटला उत्तर देत अशी टीका करणे हे अतिशय चुकीचे आणि निंदनीय आहे, असे उत्तर दिले आहे.
मागे प्रियांकाने देखील आपल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की, रोल किती छोटा आहे? किती मोठा आहे? हे महत्त्वाचे नसते. तर तुम्ही किती मनापासून काम करता हे महत्त्वाचे असते, असे सांगितले होते. प्रियांकाच्या या आठ मिनिटांच्या रोलबद्दल तुम्हाला काय वाटते?
Why are netizens trolling Priyanka Chopra?
महत्त्वाच्या बातम्या
- भारतातील पहिली एलएनजी बस नागपुरात बनविण्यात आली
- Corona : कोरोनाचा वाढता आकडा – महाराष्ट्रात गेल्या २४ तासात सापडले १६०० नवे रुग्ण
- WATCH : वेळ पडल्यास कठोर निर्बंध; लॉकडाऊनचा निर्णय राज्य सरकारचा – भारती पवार
- औरंगाबाद : धर्मवापसी ! ५३ जणांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करुन हिंदूधर्म स्विकारला-आणखी ६५ जणांची ‘धर्मवापसी’ होणार…