• Download App
    सुपरस्टार रजनीकांत यांनी दादासाहेब फाळके पारितोषिक ज्या मित्राला डेडिकेट केले ते 'राज बहादूर' आहेत कोण? | Who is the 'Raj Bahadur' friend of superstar Rajinikanth?

    सुपरस्टार रजनीकांत यांनी दादासाहेब फाळके पारितोषिक ज्या मित्राला डेडिकेट केले ते ‘राज बहादूर’ आहेत कोण?

    विशेष प्रतिनिधी

    बंगलोर : लिजेंडरी अॅक्टर रजनीकांत यांना नुकताच भारतातील सर्वोच्च दादासाहेब फाळके या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्या भाषणामध्ये त्यांनी हा पुरस्कार त्यांचा मित्रा राज बहादूर याला डेडिकेट केला आहे. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोण आहेत हे राजबहादूर.

    Who is the ‘Raj Bahadur’ friend of superstar Rajinikanth?

    पी राज बहादूर हे 76 वर्षीय बँगलोर मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन मधून सेवानिवृत्त झालेले एक ड्रायव्हर आहेत. चामराजपेठमधील राहणारे बहादूर हे रजनीकांत यांचे जवळचे मित्र आहेत. रजनीकांत यांनी जेव्हा कंडक्टर म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी बहादूर त्या बसचे ड्रायव्हर म्हणून काम करायचे. तेव्हापासूनची त्यांची ही मैत्री आजतागायत अस्तित्वात आहे.

    1970 मध्ये रजनीकांत यांनी कंडक्टर म्हणून नोकरी करण्यास सुरूवात केली होती. यांची मैत्री आता 50 वर्ष जुनी मैत्री आहे. आणि इतक्या वर्षा नंतर या दोघांच्या मैत्रीमध्ये काहीही बदललेलं नाहीये. दादासाहेब फाळके अवॉर्ड स्वीकारताना रजनीकांत यांनी आपल्या या मित्राचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये केला होता. यावर आपले मत व्यक्त करताना बहादूर म्हणाले, रजनीकांत हा अतिशय नम्र अभिनेता आहे. तो एक खूप प्रेमळ मित्रदेखील आहे. त्याच्या भाषणामध्ये माझ्या नावाचा उल्लेख करण्याची काहीच गरज नव्हती. हा त्याचा मोठेपणा म्हणावे लागेल. रजनीकांत जसा माझ्यासोबत प्रेमाने वागतो तसा तो त्याच्या सर्व मित्रांसोबतही असतो.


    Dadasaheb Phalke Award : सुपरस्टार रजनीकांत यांना मिळणार दादासाहेब फाळके पुरस्कार, ट्विटद्वारे दिली ही प्रतिक्रिया


    रजनीकांत यांच्या करिअरच्या सुरूवातीच्या काळाबद्दल सांगताना बहादूर म्हणाले, जरी त्याने कंडक्टर म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली असली, तरी त्याच्यामध्ये एक वेगळाच स्पार्क आम्हा सर्वांना जाणवायचा. इम्प्लॉई असोसिएशनद्वारे कोणताही कार्यक्रम असेल तर त्या ड्रामामध्ये रजनीकांत लीड अॅक्टरची भूमिका प्ले करायचे. एका अशाच प्ले दरम्यान लिजेंड्री तमिळ डिरेक्टर के भालचंद्र यांची नजर रजनीकांत यांच्यावर पडली होती. त्यांनी रजनीकांत यांचे अॅक्टिंग टॅलेण्ट बहुधा ओळखले असावे म्हणूनच त्यांनी रजनीकांत यांना तमिळ शिकण्यास सांगितले होते.

    त्यानंतर दोन महिन्यांनी त्यांनी रजनीकांत यांना बोलावून घेतले होते. आपल्या सिनेमामध्ये रोल होता पण तुला तमिळ येत नाही. त्यामुळे मी हा रोल तुला देऊ शकत नाही, असे सांगितले हाेते. त्यावेळी रजनीकांत यांनी तामिळमध्ये मला तमिळ भाषा आता येते, मी दोन महिन्यांमध्ये भाषा शिकली आहे, असे उत्तर दिले होते. आणि त्यानंतर त्यांचा चित्रपटसृष्टीमधील प्रवास सुरू झाला होता. असे रजनीकांत यांचे मित्र राज बहादूर यांनी इंडियन एक्सप्रेस सोबत बोलताना सांगितले आहे.

    रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यामुळे राज बहादूर त्यांना चेन्नईला भेटण्यासाठी निघाले आहेत. राजबहादुर ते व्यक्ती आहेत ज्यांनी रजनीकांत यांना त्यांच्या अॅक्टिंग स्किल्सची, त्यांच्या वेगळ्या स्पार्कची ओळख करून दिली होती.

    Who is the ‘Raj Bahadur’ friend of superstar Rajinikanth?

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी