विशेष प्रतिनिधी
मुंबई : पवित्र रिश्ता या मालिकेमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे इंटरनेटवर प्रचंड लोकप्रिय आहे. नुकताच ती विकी जैनसोबत विवाहबद्ध झाली आहे. मुंबईतील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये या दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे. तर बऱ्याच लोकांचा प्रश्न पडला आहे की अंकिताचा नवरा नेमक करतो काय?
Who is Ankita Lokhande’s husband Vicky Jain?
तर विकीने पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रामध्ये आपले पदवी शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर त्याने जमुनालाल बजाज कॉलेजमधून आपले एमबीए पूर्ण केले. त्यानंतर त्याने फॅमिली बिझनेस सांभाळण्यास सुरूवात केली.
कोळशाचा व्यापार, वॉशरी, लॉजिस्टिक्स, पॉवर प्लांट, रिअल इस्टेट आणि डायमंड असे मोठे व्यवसाय विकीचे आहेत. त्यांचा रिअल इस्टेट बिझनेस मुंबईमध्ये चांगला सेटल आहे. महावीर बिल्डर्स आणि प्रमोटर्स असं त्यांच्या कंपनीचं नाव आहे. शिवाय बिलासपूरमध्ये जैन कुटुंबीयांचं फर्निचरचा शोरूमही असल्याचे वृत्त आहे. विकीचे वडील विनोद जैन हे बिलासपूरमधील डेंटल इन्स्टिट्यूटच्या व्यवस्था संस्थापकांपैकी एक आहेत.
अंकिता सध्या पवित्र रिश्ता 2 मध्ये काम करताना दिसून येत आहे. पवित्र रिश्ता ज्यामध्ये सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांनी अर्चना आणि मानव यांचे कॅरेक्टर प्ले केले हाेते. ही मालिका प्रचंड प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे आणि पवित्र रिश्ता 2 ला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांनी या मालिकेला पाहाणे टाळले होते.
Who is Ankita Lokhande’s husband Vicky Jain?
महत्त्वाच्या बातम्या
- अमेरिकेत विदाऊट ड्रायव्हरची गाडी, राज्यामध्ये लोकशाही विदाऊट मुख्यमंत्री; सुधीर मुनगंटीवार
- बेकायदेशीर सावकारीबाबत थेट पुणे पोलिसांना देऊ शकता माहिती ; जारी केला एक व्हॉट्सअप नंबर
- ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्राने महाराष्ट्राला दिल्या ८ महत्वाच्या सूचना ; वाचा सविस्तर
- … मुख्यमंत्रिपदाची धुरा रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवा; चंद्रकांत पाटलांची शिवसेनेला कोपरखळी