• Download App
    विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या लग्नाचा चौथा वाढदिवस, पाहा विरुश्काचे आजवर न पाहिलेले सुंदर फोटोज | Virat Kohli and Anushka Sharma celebrates fourth wedding anniversary

    विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या लग्नाचा चौथा वाढदिवस, पाहा विरुश्काचे आजवर न पाहिलेले सुंदर फोटोज

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचा आज चौथा वाढदिवस आहे. यानिमित्ताने अनुष्काने आणि विराटने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या दोघांचे बरेच फोटो शेअर केले आहेत आणि एकमेकांसाठीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

    Virat Kohli and Anushka Sharma celebrates fourth wedding anniversary

    अनुष्का विराट बद्दलच्या भावना व्यक्त करताना म्हणते की, वेळोवेळी मला आधार दिल्याबद्दल थॅंक्यु. तुला जवळून ओळखणाऱ्या व्यक्तींनाच तुझं महत्त्व कळतं. त्यापैकी एक मी आहे. याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते. मला वेळोवेळी प्रेरणा दिल्याबद्दल थँक्यू. असा बराच मोठा मेसेज तिने आपल्या नवऱ्या साठी लिहून आपले प्रेम सोशल मिडियाद्वारे व्यक्त केले आहे.


    Virat Kohli : कर्णधारपदी असताना देशात एकही टी-20 सिरीज गमावली नाही, असा होता विराट कोहलीचा टी-२० प्रवास


    तर विराटने देखील आपली मुलगी आणि अनुष्कासोबतचा एक फोटो शेअर करत अतिशय भावनिक पोस्ट लिहिली आहे. तो लिहितो की, चार वर्षांत माझे सिली जोक्स आणि माझा आळशीपणा सांभाळल्याबद्दल थँक्यू. मी जसा आहे तसा मला स्वीकारल्याबद्दल थँक्यू. मी कितीही इरिटेटिंग आहे तरी मला सहन केल्याबद्दल थॅंक्यू. अशा शब्दांमध्ये त्यांने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

    अनुष्का आणि विराट भारतातील एक सर्वात आवडते कपल आहे.

    Virat Kohli and Anushka Sharma celebrates fourth wedding anniversary

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी