• Download App
    कारकिर्दीतील दुसरा एमी अवॉर्ड जिंकला केट विन्स्लेटने! मेयर ऑफ ईस्टटाऊन या सीरिजसाठी मिळाला अवॉर्ड | Titanic fame actress kate wins 2nd emmy award of her career, 'mare of easttown' continues to wow people

    कारकिर्दीतील दुसरा एमी अवॉर्ड जिंकला केट विन्स्लेटने! मेयर ऑफ ईस्टटाऊन या सीरिजसाठी मिळाला अवॉर्ड

    विशेष प्रतिनिधी 

    कॅलिफोर्निया : टायटॅनिक फेम अभिनेत्री केट विन्सलेट हिने आपल्या करिअरमधला दुसरा इमी अवॉर्ड नुकताच जिंकला आहे. एचबीओ वरील पॉप्युलर शो ‘मेयर ऑफ ईस्टटाउन’ या सीरिजमध्ये लीड कॅरेक्टर केटने प्ले केले होते. ‘मेयर ऑफ इस्टटाऊन’ मधील तिच्या आऊटस्टँडिंग परफॉर्मन्ससाठी तिला यावेळचा एमी अवॉर्ड घोषित करण्यात आला आहे.

    Titanic fame actress kate wins 2nd emmy award of her career, ‘mare of easttown’ continues to wow people

    तिच्या कारकिर्दीमधील हा तिचा दुसरा एमी अवॉर्ड आहे. याआधी तिला २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘माइल्डरेड पीयर्स’ या सीरिजसाठी हा अवॉर्ड मिळाला होता. ब्रॅड एंगेल्सबी निर्मित मेयर ऑफ ईस्टटाउन ही अमेरिकन क्राइम ड्रामा सीरिज आहे. या सीरिजमध्ये केटने ‘मेरियाना शीहान’ हे कॅरेक्टर प्ले केले आहे. मेरीयाना एक डिटेक्टिव्ह असते. फिलाडेल्फिया जवळील एका छोटय़ाशा गावामध्ये झालेल्या खुनाचा शोध ती घेत असते.


    दीपिकाने हॉलिवूड कंपनीसोबत केली  मोठी भागीदारी , बनेल ‘या’ चित्रपटाची नायिका


    ज्युली निकोलसन, जीन स्मार्ट, अँगौरी राइस, इवान पीटर्स, सुजी बेकॉन, डेव्हिड डेमन इत्यादी कलाकार या सीरिजमध्ये सहाय्यक कलाकाराच्या भूमिकेमध्ये दिसून आले आहेत. पैकी ज्युलियन निकोल्सन हिने ‘मेयर ऑफ ईस्टटाउन’ या सीरिज मधील आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठीचा ‘बेस्ट सपोर्टिंग अभिनेत्री चा एमी अवॉर्ड जिंकला आहे. तिने या सिरीजमध्ये केटच्या जवळच्या मैत्रिणीचे कॅरेक्टर प्ले केले आहे.

    अमेरिकन कलाकार इव्हन पीटरसणने सुद्धा यावेळचा इमी अवॉर्ड जिंकला आहे. उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरूष या कॅटेगरीमधील अवॉर्ड त्याला ‘मेयर ऑफ ईस्टटाऊन’ या सीरिजसाठी मिळाला आहे. यामध्ये त्याने डिटेक्टिव्हचा रोल प्ले केला आहे. १३ जुलै रोजी एमी अवॉर्डचे नॉमिनेशनस जाहीर करण्यात आले होते.

    Titanic fame actress kate wins 2nd emmy award of her career, ‘mare of easttown’ continues to wow people

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी