• Download App
    रॉबर्ट पॅटिन्सनची प्रमुख भूमिका असलेल्या 'द बॅटमॅन' सिनेमाचा ट्रेलर झाला प्रदर्शित | The trailer for the movie 'The Batman' starring Robert Pattinson has been released

    रॉबर्ट पॅटिन्सनची प्रमुख भूमिका असलेल्या ‘द बॅटमॅन’ सिनेमाचा ट्रेलर झाला प्रदर्शित

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : रॉबर्ट पॅटिन्सन हा हॉलिवूडमधील एका यशस्वी अभिनेत्यांपैकी एक अभिनेता आहे. हॅरी पॉटर, Twilight अशा सिनेमांमधून त्याने जागतिक प्रसिद्धी मिळवली होती. असा हा द मोस्ट हँडसम हिरो ह्यावेळी कोणत्याही रोमँटिक भूमिकेत नाही तर सुपर हिरोच्या भूमिकेत झळकणार आहे.

    The trailer for the movie ‘The Batman’ starring Robert Pattinson has been released

    रॉबर्ट पॅटिन्सन याची प्रमुख भूमिका असणारा ‘द बॅटमॅन’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची रिलीज डेट दरवेळी पुढे ढकलण्यात येत होती कारण कोरोना आणि लॉक डाऊन मुळे सिनेमाचे चित्रीकरण बऱ्याच वेळा थांबवावे लागले होते. 21 जून 2021 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण आता हा सिनेमा 4 मार्च 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. रॉबर्ट पॅटिन्सनच्या चाहत्यांसाठी ही एक अतिशय आनंदाची बातमी आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्या नंतर काही कालावधीच्या आताच चाहत्यांकडून प्रचंड मोठी पसंती मिळत आहे.


    ६ वेळा हॉलिवूड मधे वापरण्यात आले रहमान यांचे संगीत


    ‘द बॅटमॅन’ हा एक ऍक्शन सिनेमा आहे. या सिनेमाचे डिरेक्टर आहेत मॅट रिव्ह्ज. झोई क्रॅव्हेट्स, पाऊल नॅनो, कोलिन फॉरेन इत्यादी कलाकार रॉबर्ट पॅटिन्सन सोबत या सिनेमांमध्ये झळकणार आहेत. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांची आणि चाहत्यांनी अतिशय एक्सायटिंग अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर रोमॅंटिक हँडसम म्हणून प्रतिमा असणाऱ्या रॉबर्टला सुपर हिरोच्या भूमिकेत पाहणे ही त्याच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच आहे.

    The trailer for the movie ‘The Batman’ starring Robert Pattinson has been released

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी