विशेष प्रतिनिधी
मुंबई: झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले आहे. अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. या कार्यक्रमात मराठी चित्रपट, नाटकक्षेत्र आणि राजकारणातील मोठी मंडळी येऊन गेली आहेत. तसेच अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनीही ‘हवा येऊ द्या’ च्या सेटला भेट दिली आहे.
The new season of ‘chala hawa yeu dya’ will start from this date
नुकतेच झी मराठीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम प्रोफाइलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या मजेशीर व्हिडिओमध्ये निलेश साबळे, भारत गणेशपुरे, भाऊ कदम आणि कुशल बद्रिके ही सर्व मंडळी विमानात बसलेली दिसत आहे. श्रेया बुगडे ही विमानाच्या मागून येत असून सागर कारंडे विमानाच्या पंखांना लटकलेला दिसत आहे. या विमानावर ‘भाऊचा पंगा अमेरिकेत दंगा; ‘चला हवा येऊ द्या’ वऱ्हाड निघाले अमेरिकेला’ असे लिहिले आहे. यातून ‘चला हवा येऊ द्या’ चे पुढील कार्यक्रम हे अमेरिकेत होणार असल्याचा अपडेट दिला गेला आहे.
https://www.instagram.com/p/CW2p0NVKFnt/?utm_source=ig_web_copy_link
चला हवा येऊ द्या : असं नेमक काय झालं निलेश साबळेला धरावे लागले नारायण राणेंचे पाय
या पोस्टच्या खाली कॅप्शनमध्ये हे नवीन पर्व ६ डिसेंबर पासून सुरू होणार असल्याचे सांगितले आहे. आत्तापर्यंत या कार्यक्रमाला सर्व प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या शोमधील भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे यांचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. आता ही मंडळी अमेरिकेत जाऊन काय धमाल करतात तसेच परदेशातही हा कार्यक्रम तितकाच लोकप्रिय होतो का याची उत्सुकता सर्वाना लागून राहिली आहे.
The new season of ‘chala hawa yeu dya’ will start from this date
महत्त्वाच्या बातम्या
- रामजन्मभूमी खटल्याचा निकाल धर्माच्या नव्हे तर कायदे आणि संविधानाच्या आधारावर, रंजन गोगोई यांनी केले स्पष्ट
- जमीनीवरील राजकारणी, वेदना सहन करत महिला खासदार सायकलवर जाऊन प्रसुतीसाठी झाल्या दाखल
- नव्या वर्षात १२ सुट्या वाया! शनिवार-रविवारी आल्याने होणार कर्मचाऱ्यांचे नुकसान
- सायरस पूनावाला सोडून जगातील सगळ्या धनाड्यांना ओमिक्रॉन कोरोना व्हायरस झटका, अब्जावधी रुपयांचे नुकसान