स्वरा भास्करला अटक करा…!! ट्विटरवर ट्रेंड
प्रतिनिधी
मुंबई : अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यावर बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर चिडली… भयंकर चिडली आणि अखेरीस हिंदूंनाच दहशतवादी ठरवून मोकळी झाली…!! निमित्त झाले, भारतातल्या नेटिझन्सनी सोशल मीडियावर पुरोगाम्यांना आणि लिबरल्सना ठोकून काढल्याचे…!! Swara Bhaskar targets Hindus as terrorists
तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानची सत्ता काबीज केल्यानंतर भारतात धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरून हिंदुद्वेष पसरवणाऱ्या लिबरल्स पुरोगाम्यांनी शहामृगी पवित्रा घेत मौन बाळगले होते. त्यामुळे नेटिझन्स सोशल मीडियातून त्यांच्यावर बरसत आहेत. या टीकेने अस्वस्थ होऊन बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने थेट हिंदूंनाही दहशतवादी म्हणून जाहीर करून टाकले आहे. त्यामुळे स्वरा भास्करने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, म्हणून तिला अटक करण्यात यावी, या मागणीसाठी #ArrestSwaraBhasker हा ट्विटर ट्रेंड सुरु झाला आहे.
– काय म्हटले आहे स्वरा भास्करने?
आम्ही हिंदुत्ववादी दहशतवाद्यांसोबत सुरक्षित असू शकत नाही आणि आम्हाला तालिबान्यांच्या दहशतीचाही धक्का बसला आहे. आम्ही तालिबान्यांच्या दहशतीसोबत शांत राहू शकत नाही आणि आम्ही हिंदुत्ववादी दहशतवाद्यांप्रतीही संताप ठेवू. आमची मानवतावादी आणि नैतिक मूल्ये ही अत्याचारी किंवा दडपशाहीच्या ओळखीवर आधारित नसावीत.
काय म्हणतायेत नेटिझन्स?
स्वरा भास्कर हिने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. तिच्याविरोधात भा दं वि २९५ ए अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि तिला ३ वर्षे तुरुंगात पाठवा.
स्वरा भास्कर हिने हिंदूंची धार्मिक भावना दुखावली आहे. खोटे आरोप केले आहेत. धर्मिक द्वेष पसरवत आहे.
Swara Bhaskar targets Hindus as terrorists
महत्वाच्या बातम्या
- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून भाजप कार्यकर्त्याची निर्घृण हत्या
- शबरीमला मंदिरात वडिलांसोबत दर्शनास जाण्याची अल्पवयीन मुलीला परवानगी
- मराठवाड्यात सर्वदूर बरसल्या श्रावणधारा, पावसामुळे पिकांना मिळाले जीवदान
- महाराष्ट्र ठरले एक कोटी जनतेला दोन्ही डोस देणारे देशातील पहिले राज्य
- राज्याच्या पोलिस महासंचालकांच्या नावे बनावट फेसबुक प्रोफाईल