• Download App
    आजाराने ग्रस्त चाहतीसाठी सुपरस्टार रजनीकांत यांनीं शेअर केला सकारात्मकता देणारा स्पेशल व्हिडीओ | Superstar Rajinikanth shares a positive video for his ill fan

    आजाराने ग्रस्त चाहतीसाठी सुपरस्टार रजनीकांत यांनीं शेअर केला सकारात्मकता देणारा स्पेशल व्हिडीओ

    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई : अभिनेते रजनीकांत यांना साउथ इंडस्ट्रीमध्ये देव मानले जाते. त्यांचा चाहता वर्ग देखील प्रचंड मोठा आहे. नुकताच त्यांचा अनाथे हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. 12 डिसेंबर रोजी रजनीकांत यांनी आपला 71 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाचे व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाले होत. आणि काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील झाली होती.

    Superstar Rajinikanth shares a positive video for his ill fan

    नुकताच रजनीकांत यांनी आपल्या एका सौम्या नावाच्या चाहतीसाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांची ही चाहती सौम्या एका आजाराने ग्रस्त असल्याने रजनीकांत यांनी तिला आधार देण्यासाठी, सकारात्मकता देण्यासाठी एक व्हिडिओ बनवून शेअर केला आहे. ह्या व्हिडीओ मध्ये ते म्हणताहेत की, हॅलो सौम्या, तू कशी आहेस? काळजी करू नकोस. तू लवकरात लवकर बरी होशील. माफ कर कोविड मुळे मी प्रत्यक्षात भेटू शकत नाही. माझी तब्येतही थोडी बरी नाहीये. पण तुला मी नक्कीच भेटायला आलो असतो. तुझ्या चांगल्या आरोग्यासाठी मी नक्कीच प्रार्थना करेन. काळजी करू नको. तू लवकर बरी होशील. असा संदेश त्यांनी या चाहतीला दिला आहे.


    Superstar Rajanikant : अभिनेता रजनीकांत यांची प्रकृती खालावली ; चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल


    यश कधीही डोक्यात न जाऊ देता अतिशय ग्राऊंडेड राहणारे अभिनेते म्हणून साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांना जगभर ओळखले जाते. एक माणूस त्याच्याकडे असणाऱ्या पैशांमुळे मोठा होत नसतो तर त्याच्या लाखमोलाच्या मोठ्या मनामुळे होत असतो हे रजनीकांत यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

    Superstar Rajinikanth shares a positive video for his ill fan

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी