विशेष प्रतिनिधी
मुबंई : हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचे बरेच शो हाऊसफुल झाले आहेत. प्री बुकिंग ही जोरात सुरू आहे. वीकेंडला ठाण्यातील एका मल्टिप्लेक्समध्ये या चित्रपटाचे 18 शो लागले होते आणि ते सर्व हाऊसफुल आहेत. या चित्रपटाची सोशल मिडीयावर बरीच मोठी चर्चा रंगली आहे.
Strong discussion of Jhimma movie! Directed by Hemant Dhome, the film is getting good response from the audience
या चित्रपटामध्ये सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले आणि सोनाली कुलकर्णी हे कलाकार प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे. त्या छायाचित्रण संजय मेमाणे यांनी केले आहे. कोरोना, लॉकडाऊन नंतर तब्बल दोन वर्षांनंतर एक मराठी चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. त्यामुळे चित्रपटाच्या टीमने प्रमोशनदरम्यान प्रचंड धमाल केलेली दिसून येत आहे.
हेमंत ढोमे यांचा नवीन वेगळ्या धाटणीचा चित्रपट झिम्मा १९ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित
चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादा बद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. या पाठिंब्यामुळे एक प्रकारचे बळ मिळते. आणि या प्रतिसादामुळे मराठी चित्रपटसृष्टी व तुम्ही किती प्रेम करता हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. आणि विशेष म्हणजे शासनाच्या नियमानुसार 50 टक्के सीट्सची परवानगी असूनही कोरोना बद्दलच्या भीतीवर मात करत प्रेक्षकांनी चित्रपटगृहांमध्ये येऊन या चित्रपटाचा आनंद घेतला याबद्दल त्यांनी आभार मानले आहेत.
Strong discussion of Jhimma movie! Directed by Hemant Dhome, the film is getting good response from the audience
महत्त्वाच्या बातम्या
- ‘माझ्याकडे नवाब मलिक आणि दाऊदच्या संबंधांचे पुरावे’, समीर वानखेडे यांच्या पत्नीच्या चॅट्स मलिकांकडून शेअर, क्रांती रेडकर यांनी दिले स्पष्टीकरण
- टीम इंडियाच्या डाएट प्लॅनवरून वाद, हलाल मीट अनिवार्य करण्यावरून नेटकऱ्यांचा बीसीसीआयवर संताप
- मोठी बातमी : इंधनाचे दर कमी करण्यासाठी भारताची आपल्या स्ट्रॅटेजिक रिझर्व्हमधून कच्चे तेल सोडण्याची तयारी
- खासदार असदुद्दीन ओवेसी यांना सोलापूर वाहतूक पोलिसांनी केला २०० रुपयांचा दंड ; जाणून घ्या नेमक काय आहे कारण
- 26 /11 च्या हल्ल्यानंतर यूपीए सरकारच्या प्रतिकारात कमजोरी दिसली; काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांचा हल्लाबोल