विशेष प्रतिनिधी
मुंबई: काही स्टार पुत्र व कन्यांना अभिनयात करिअर करायचे नव्हते. त्यांची अभिनय कारकीर्द फार काळ चालली नाही म्हणून म्हणा, पण या मुलांनी इतर उद्योग करत नाव मिळवले आहे.
अशा काही स्टार पुत्र, कन्यां बद्दल जाणून घेऊ.
Star Kids who are running highly successful businesses
१ – एकता कपूर: प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांची मुलगी मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. तिच्या दोन कंपन्या आहेत. एक बालाजी मोशन पिक्चर्स व ALT बालाजी. तिची एकूण संपत्ती १३ मिलियन डॉलर आहे.
२ – तुषार कपूर: ‘गोलमाल’ मधील भुमिकेमुळे ओळखला जाणारा तुषार कपूर. तुषार कपूर मनोरंजन क्षेत्रात आहे. Laxmii हा डिस्ने +हॉटस्टार वरील चित्रपट त्याची पहिली निर्मिती आहे. त्याची एकुण संपत्ती ११ मिलियन डॉलर आहे.
३ – ट्विंकल खन्ना- राजेश खन्नाची कन्या ट्विंकल हीचे सिनेमातील कारकीर्द यशस्वी पण कमी काळ टिकले. ती Tweak India नावाच्या डिजिटल मिडिया प्लॅटफॉर्मची मालक आहे, तसेच निर्माती, लेखिका, इंटिरिअर डिझायनर या क्षेत्रात कार्यरत आहे. तिची संपत्ती ३० मिलियन डॉलर आहे
४- कृष्णा श्रॉफ – जॅकी श्रॉफची मुलगी MMA Matrics fitness centre आपल्या भावासोबत चालवते व स्पोर्टिंग लिग Matrics Fight Night चालवते. २०२० मधे तिची संपत्ती अंदाजे ३ मिलियन डॉलर होती.
स्टार किड्स कडूनही मुव्हीज काढून घेतल्या जातात? सोनाक्षी सिन्हाने नेपोटीझमवर व्यक्त केले आपले विचार
५- उदय चोप्रा : यश चोप्रांचा मुलगा YRF एंटरटेनमेंट कंपनी व कॉमिक बुक कंपनी ‘Yomics’ चालवतो. त्याची अंदाजे संपत्ती ५ मिलियन डॉलर आहे.
६ – ईशा देओल: इशाचे धूम व युवा सारखे काही चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. ती निर्माती आणि ओडीशी डान्सर आहे. इशाची संपत्ती अंदाजे २-५ मिलियन डॉलर आहे.
७- रिद्धीमा कपूर साहनी- ऋषीकपूर आणि निता कपूरची ही मुलगी ज्यूवेलरी डिझायनर आहे. ‘R’ हा तीचा ब्रॅंड. संपत्ती अंदाजे ३ मिलियन डॉलर आहे.
८ – रिहा कपूर : अनिल कपूरची मुलगी रीहा ही निर्माती, तसेच Rheson या फॅशन लाइनची सहमालक आहे. संपत्ती अंदाजे ६ मिलियन डॉलर आहे.
९ – श्वेता बच्चन: अमिताभ-जया बच्चनची ही मुलगी लेखिका आहे. ती मॉडेल पण होती. तिने आपले फॅशन लेबल MXS मोनिशा जयसिंग सोबत सुरू केले आहे. तिची संपत्ती अंदाजे ८ मिलियन डॉलर आहे (२०२०).
१० – सबा अलि खान: सबा अली, ही शर्मिला टागोरची मुलगी आहे. ती ज्वेलरी डिझायनर तसेच टॅरोट रिडर आहे. ती पतौडी घराण्याचे उद्योग पण सांभाळते.
Star Kids who are running highly successful businesses
महत्त्वाच्या बातम्या
- रक्षा खडसेंचा मुख्यमंत्र्यांवर आरोप ; म्हणाल्या- ” मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला पाहिजे “
- महाराष्ट्रातल्या 60 कारखान्यांना प्राप्तिकर विभागाच्या नोटिसा; सध्या छापे पवारांशी संबंधित साखर कारखान्यांवर
- ED Raid : अजित पवार काहीही लपवत नाहीत ; जयंत पाटलांनी केली अजित पवारांची पाठराखण
- मी आर्थिक शिस्तीचा माणूस; माझ्या बहिणींशी संबंधित मालमत्तांवर छापे ही राजकीय सूडबुद्धी; अजितदादांची संतप्त प्रतिक्रिया