तसेच आम्हाला कोरोनाची लागण झाली असली तरी हॅप्पी कोरोना पॉझिटीव्ह फॅमिली आहे.अस देखील सोनू निगम म्हणाला. Singer Sonu Nigam contracted corona ; Wife and son in Corona’s lap
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मागील काही दिवसांपासून राजकीय नेते तसेच अभिनेते कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत.अशातच प्रसिद्ध गायक सोनू निगम याला कोरोनाची लागण झाली आहे.सोनू निगमने सोशल मीडियावर एक 3 मिनीटांचा व्हिडीओ शेअर करत कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती दिली आहे.
तसेच तो पुढे म्हणाला , त्याचा मुलगा नीवान निगम ,पत्नी मधुरिमा निगम यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.तसेच घाबरण्यासारखे काहीच नाही. आमच्या शेजारी बरेच लोक कोरोनाचे आढळत आहेत. हे खूप वेगाने पसरत आहे. मला खूप वाईट वाटत आहे, कारण आत्ता कुठे आम्ही कामाला सुरुवात केली होती. तसेच आम्हाला कोरोनाची लागण झाली असली तरी हॅप्पी कोरोना पॉझिटीव्ह फॅमिली आहे.अस देखील सोनू निगम म्हणाला.
Singer Sonu Nigam contracted corona ; Wife and son in Corona’s lap
महत्त्वाच्या बातम्या
- मास्क नसल्यास ५०० रुपये दंड, रस्त्यावर थुंकल्यास एक हजार रुपये दंड; कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुण्यात कठोर उपाय
- अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्रासह घेतले सप्तशृंगी देवीचे दर्शन
- माई गेल्या असं कुणीही म्हणू नका , मुलगी ममता सपकाळ यांचं आवाहन
- चीनच्या चिथावणीने डाव्या विचारसरणीच्या कामगारांकडून उद्योगांत अशांतता , चेन्नईतील फॉक्सकॉनचा प्रकल्प बंद पाडण्यासाठी आंदोलन
- काश्मीर, उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी, विमानसेवा प्रभावित, रस्त्यांवरील बर्फ हटविण्याचे काम सुरू