माझ्या ब्रा ची साईज देवच मोजत आहे, असे अश्लिल विधान केल्यामुळे प्रसिध्द टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत आली आहे. तिच्या वक्तव्याची २४ तासांत चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश मध्य प्रदेशचे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिले आहे. Shweta Tiwari says God is measuring the size of my bra, Madhya Pradesh Home Minister orders inquiry
विशेष प्रतिनिधी
भोपाळ : माझ्या ब्रा ची साईज देवच मोजत आहे, असे अश्लिल विधान केल्यामुळे प्रसिध्द टीव्हीअभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत आली आहे. तिच्या वक्तव्याची २४ तासांत चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश मध्य प्रदेशचे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिले आहे.
श्वेता तिवारी भोपाळमध्ये तिच्या आगामी वेब सीरिजच्या प्रमोशनदरम्यान आयोजति कार्यक्रमात बोलत होती. यावेळी ती म्हणाली, ‘मेरे ब्रा की साइज भगवान ले रहे है’. श्वेताचे हे विधान सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या विधानाचा निषेध करत भोपाळ पोलिस आयुक्तांकडून संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. ते म्हणाले, मी श्वेता तिवारीचे वक्तव्य पाहिले आणि ऐकले आहे. मी भोपाळ पोलिस आयुक्तांना चौकशी करून अहवाल लवकर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांनी अहवाल दिल्यानंतर तिच्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
श्वेता तिवारीने असे वक्तव्य कशाच्या आधारावर केले, याचा तपास केला जाईल, असे मिश्रा म्हणाले. यामागे तिचा हेतू काय होता? 24 तासांच्या आत भोपाळचे पोलीस आयुक्त वस्तुस्थिती तपासून त्यांना अहवाल सादर करतील, असे गृहमंत्र्यांनी स्वत: स्पष्ट केले आहे.
श्वेता तिवारी ही आपल्या ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते. आता फॅशन इंडस्ट्रीवर आधारित वेब शोमध्ये एका नव्या स्टाईलमध्ये ती मुख्य भूमिका साकारणार आहे. या वेब सिरीजमध्ये सौरभ राज जैन आणि रोहित रॉय देखील आहेत. भोपाळच्या लोकेशन्सवर शूट करण्यात आले आहे, असे अहवालात म्हटले आहे. श्वेता तिवारीचे विधान हा देवाचा अपमान आहे, असे लोक म्हणत आहेत. हा एक प्रकारचा अपमानास्पद आहे असे म्हणत लोकांनी नाराजी घेतली आहे. हे नेमके कोणत्या संदर्भात बोलले गेले हे आतापर्यंत कळलेले नाही. मिश्रा यांनीच सनी लिओनचे मधुबन गाण्याचा निषेध केला होता. हिंदू संस्कृती आणि भावना दुखावल्या आहेत, असे त्यांनी म्हटले होते.
Shweta Tiwari says God is measuring the size of my bra, Madhya Pradesh Home Minister orders inquiry
महत्त्वाच्या बातम्या
- महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेसला जबरदस्त धक्का, मालेगावच्या नगराध्यक्षांसह 28 नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
- नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला; दहा दिवसात शरण येण्याचे आदेश
- 69 वर्षांनंतर एअर इंडिया आजपासून टाटांची, टाटा सन्सचे अध्यक्ष हस्तांतरापूर्वी पंतप्रधानांची भेट घेणार