बऱ्याच समर्थकांनी सोशल मीडियावर कमेंट करून नाराजी व्यक्त केली आहे. यातून अस स्पष्ट होत आहे की शिवलीला यांना बिग बॉसच्या घरात जाण्याची गरज नव्हती.”Shivalila tai, you are a kirtankar, your society needs you, not Bigg Boss, supporters are upset.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉस मराठी ३ कार्यक्रमाची धमाकेदार सुरुवात झाली आहे. तिसऱ्या पर्वामध्ये विविध अभिनेता अभिनेत्रिंनी प्रवेश केला आहे. तसेच यामध्ये किर्तनकार शिवलीला पाटील यांनी देखील बिग बॉसच्या घरात प्रवेश घेतला आहे. दरम्यान शिवलीलाच्या समर्थकांपैकी काही जणांना मात्र तिचे बिग बॉसच्या घरात जाणे आवडले नाही.
बऱ्याच समर्थकांनी सोशल मीडियावर कमेंट करून नाराजी व्यक्त केली आहे. यातून अस स्पष्ट होत आहे की शिवलीला यांना बिग बॉसच्या घरात जाण्याची गरज नव्हती. एका समर्थकाने “शिवलीला ताई तुम्ही कीर्तनकार आहात तुमची समाजाला गरज आहे बिग बॉसला नाही” तर दुसऱ्या समर्थकाने ” ताई मला वाटत हा तुमचा निर्णय चुकीचा ठरेल” अशी प्रतक्रिया दिली आहे.
कोण आहे शिवलीला पाटील
युवा कीर्तनकार शिवलीला पाटील सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. तिचे कीर्तनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. शिवलीला वयाच्या 5व्या वर्षापासून कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम करते. ग्रामीण भाषा आणि प्रमाण मराठी भाषेतून अगदी विनोदी पद्धतीनं ती कीर्तन करते. तिची ही खास आणि हटके स्टाईल चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरते. तिच्या मोठा चाहता वर्ग आहे.
शिवलीलाचे वडील बाळासाहेब पाटील हे सुद्धा मोठे कीर्तनकार आहेत. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत शिवलीलानं ग्रामीण आणि शहरी भागात स्वतःचा वेगळा चाहता वर्ग बनवला होता. एवढंच नाही तर तिनं महाविद्यालयीन शिक्षणही घेतलं आहे. मात्र महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच तिनं आपली कीर्तनाची आवड जोपासली त्याला खंड पडू दिला नाही.विशेष म्हणजे तिनं आतापर्यंत 10 हजारांहून अधिक कीर्तनं केली आहेत
कौटुंबिक जीवनातील आगळे वेगळे प्रसंग, समाजातील काही खास गोष्टी, मधेच विनोद करत ती कीर्तन करते. त्यामुळे तिनं स्वतःची एक स्टाईल निर्माण केली आहे. ही स्टाईल प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहे.
“Shivalila tai, you are a kirtankar, your society needs you, not Bigg Boss, supporters are upset.
महत्त्वाच्या बातम्या
- महापालिका वॉर्ड – प्रभाग रचना; अख्ख्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला ना… मग मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील ही फट का ठेवली…??
- पंजाब काँग्रेसमध्ये आता कॅप्टनचेच बंड; म्हणाले- राहुल-प्रियांका अनुभवशून्य, त्यांची सल्लागारांकडूनच दिशाभूल, सिद्धूंविरुद्ध देणार मजबूत उमेदवार!
- इरफान खानच्या द लंचबॉक्स सिनेमाला आठ वर्ष पुर्ण, नवाजुद्दीन सिद्दीकीने दिला आठवणींना उजाळा
- इंजिनाचे नाशिकवर विशेष लक्ष; पुत्र अमित ठाकरेंसह राज ठाकरे दौऱ्यावर; पण स्वागताचे फलक काढले!!