• Download App
    घटस्फोटासाठी नेहमी स्त्रीला का जबाबदार धरले जाते? समंथाने आपली संतप्त प्रतिक्रिया केली व्यक्त | Samantha's statement on rumours that blamed a woman for the Divorce

    घटस्फोटासाठी नेहमी स्त्रीला का जबाबदार धरले जाते? समंथाने आपली संतप्त प्रतिक्रिया केली व्यक्त

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : समंथा अभिनेत्री आपला पती नागा चैतन्य पासून वेगळी झाल्यानंतर प्रकाशझोतात आली आहे. त्यानंतर अशा खूप अफवाही पसरवल्या गेल्या की, हा घटस्फोट होण्यामागे समंथा कारणीभूत आहे. या प्रकरणावरून बरेच जण घटस्फोट होण्यामागे स्त्रीच कारणीभूत असल्याची चर्चा करताना नेहमीच दिसून येतात.

    Samantha’s statement on rumours that blamed a woman for the Divorce

    इंटरनेटवर तिच्याबद्दल खूप अफवाही पसरवल्या गेल्या. यामध्ये तिचे आधी कुणाशीतरी अफेयर चालू होते त्यानंतर तिने अबॉर्षन केले आणि आता संधी साधून तिने घटस्फोट घेतला अश्या खालच्या थराच्या अफवांनी जोर धरला होता. अश्या खालच्या थराच्या गोष्टी इतक्या मोठ्या आणि यशस्वी अभिनेत्री बद्दल बोलल्या जातात तर सामान्य मुलींची अवस्था किती वाईट असेल याचा एक साधारण अंदाज तुम्ही बांधू शकता. रेप झाला तरी स्त्रीला जबाबदार धरणारे लोक आजही आपल्या समाजात आहेत.


    महिला सक्षमीकरण आणि स्वाभिमानाचे‌ उदाहरण, समंथा


    या अफवा पसरवल्या गेल्यानंतर समंथाला अनेक जणांनी आधार दिला आणि त्या सर्वांचे तिने इंस्टाग्रामवरून आभार व्यक्त केले. त्यामध्ये तिने असे म्हंटले की, “तुमच्या सर्वांच्या माझ्यासाठी असणाऱ्या भावना, काळजी, प्रेम यामुळे मी खूप भारावून गेली आहे. या कठीण काळात तुम्ही सर्वांनी मला आधार दिला. तसेच चुकीच्या अफवांविरुद्ध आवाज उठवला. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची आभारी आहे. माझे अफेअर चालू होते तसेच मला मूल नको होते, मी एक संधीसाधू असून माझे अबोर्षन झाले होते, अशा प्रकारच्या निरर्थक अफवा पसरल्या गेल्या होत्या.”

    तिने असेही म्हणले की, “घटस्फोट माझ्यासाठी खूप पेनफूल प्रोसेस होती आणि मला यातून सावरायला वेळ हवा आहे. तिने आपल्या चाहत्यांना असे वचन देते की, मी यातून बाहेर पडून स्वतःला सावरेन व मी स्वतःला खचू देणार नाही”. इंस्टाग्रामवरील तिच्या पोस्टमध्ये असे म्हटले होते की, आम्ही जरी वेगळे झालो असलो तरी आमच्यातील मैत्री कायम राहणार आहे.

    समंथाला या प्रकरणातून जो त्रास सहन करावा लागला यातून आपल्याला समाजाचा स्त्रियांबद्दल असलेला दृष्टिकोन लक्षात येतो. घटस्फोट होण्यामागे स्त्रीला किती सहजतेने ब्लेम केले जाते. तसेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल टिपणी करणे हा दृष्टीकोन किती चुकीचा आहे हे लक्षात येते.

    Samantha’s statement on rumours that blamed a woman for the Divorce

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी