विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोना व्हायरसने संपूर्ण देशाची परिस्थिती गंभीर झाली आहे.प्रत्येक व्यक्ति आपल्या परीने या महामारीमध्ये मदत आणि जनजागृती करत आहे. सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींनी या करोना व्हायरसचा धसका घेतलाय.
आता दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या आगामी सिनेमाच्या RRR टीमने देखील नागरिकांना एक संदेश दिला आहे . RRR : Special video massage from team S.S.Rajamauli
दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा RRR सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आरआरआर फिल्मचे कलाकार आणि दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या टीमने एक व्हिडीयो तयार करून कोरोना व्हायरसबाबत लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे.
ब्लॉकबस्टर फिल्म ‘बाहुबली 2’ चे दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या आगामी फिल्मचं नाव ‘RRR’ आहे. दिग्दर्शक एसएस राजामौली आणि त्याच्या ‘RRR’ टीमने एक स्पेशल व्हिडीओ तयार करून लोकांना करोना लसीकरणाचं महत्व पटवून दिलंय.
या व्हिडीयोमध्ये अभिनेता अजय देवगण, राम चरण, बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि दिग्दर्शक एसएस राजमौली यांनी लोकांना कोरोनाविरोधातील या कठीण लढ्यात आपण सर्वांनी एकत्र येऊन संसर्गाची साखळी तोडण्याचं आवाहन केलंय. त्याचप्रमाणे मास्क, सॅनिटायझर आणि नियमांचं पालन करण्यास देखील आरआरआर सिनेमाच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे.
सध्या आरआरआर सिनेमाच्या या टीमचा व्हिडीयो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीयोमध्ये कलाकारांनी हिंदी, तेलगू, तमिळ, मल्ल्याळम तसंच कन्नड भाषेतून नागरिकांना आवाहन केलंय.
या स्पेशल व्हिडीओमधून ‘RRR’ टीमने तेलगू, तमिळ, कन्नड, मल्ल्याळम आणि हिंदी भाषेतून लोकांना चेहऱ्यावर मास्क लावण्यासाठी आणि करोना लस घेण्यासाठी आश्वासन मागितलं आहे.