• Download App
    'रेड नोटीस' चित्रपटाचा नवा विक्रम, नेटफ्लिक्सवर सर्वात जास्त वेळा पाहिलेला चित्रपट | 'Red Notice' new movie record, most viewed movie on Netflix

    ‘रेड नोटीस’ चित्रपटाचा नवा विक्रम, नेटफ्लिक्सवर सर्वात जास्त वेळा पाहिलेला चित्रपट

    विशेष प्रतिनिधी

    दिल्ली : रायन रेनॉल्ड्स, गॅल गॅडॉट, ड्वेन जॉन्सन यांची प्रमुख भूमिका असणारा ‘रेड नोटिस’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर काही कालावधीच्या आतच नवीन रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. नेटफ्लिक्सवर पाहिल्या गेलेल्या चित्रपटांमध्ये सर्वात जास्त काळासाठी पाहिला गेलेला चित्रपट रेड नोटीस ठरला आहे.

    ‘Red Notice’ new movie record, most viewed movie on Netflix

    याआधी हा रेकॉर्ड ‘बर्ड बॉक्स’ या चित्रपटाच्या नावावर होता. 282 मिलियन तास बर्ड बॉक्स हा सिनेमा पाहिला गेला होता. तर रेड नोटीसने फक्त 11 दिवसांमध्ये हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. हा सिनेमा एक एकूण 328 मिलियन तास पाहिला गेलेला सिनेमा ठरला आहे. जगातील एकूण ऑडियन्स ला हा पिक्चर एकंदर आवडलेला दिसून येत आहे. यासंबंधीची माहिती चित्रपटातील कलाकारांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंट वरून आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.


    Netflix : आता मित्रांना पासवर्ड शेअर करणे होईल कठीण, व्हेरिकेशन होणार अनिवार्य


    नेटफ्लिक्सवरील रेड नोटीस हा एक अॅक्शन कॉमेडी चित्रपट आहे. इजिप्तची राणी क्लिओपात्रा हिच्या काळामध्ये सोन्याची तीन अंडी बनवलेली असतात. यापैकी दोन जगातील वेगवेगळ्या अतिशय सुरक्षित जागी ठेवलेली असतात. पण तिसरे कुठे आहे हे कोणालाच माहीत नसते. तर जगातील सर्वात फेमस आर्ट थीफ असणार्या व्यक्तीलाच फक्त ही माहिती असते. त्यांना ते तिसरे सोन्याचे अंडे मिळते का? या तीन चोरांपैकी ते अंडे कोणाकडे जाते? ही सर्व कथा सांगणारा हा एक अॅक्शन कॉमेडी चित्रपट आहे.

    ‘Red Notice’ new movie record, most viewed movie on Netflix

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी