विशेष प्रतिनिधी
मुंबई: १९४० मध्ये सरदार ऊधमसिंग यांनी जालियनवाला बाग प्रकरणातील जनरल डायरला गोळी घातली होती. उधमसिंग यांना गोळी झाडल्यावर लगेचच अटक करून कोर्टात हजर करण्यात आले. त्यांच्यावरील आरोपांबद्दल जे उत्तर दिले होते ते ब्रिटिश सरकारने प्रसिद्ध केले नव्हते. ते खालीलप्राणे.
Real speech of Sardar Udham Singh that was banned for decades in his courtroom trial
“मी ब्रिटिश साम्राज्यवादाचा निषेध करतो. तुम्ही म्हणता भारतात शांतता नाही. आम्ही गुलामगिरीत आहोत. तथाकथित संस्कृतीने आमच्यासाठी मानव वंशाला माहीत असलेल्या सर्व वाईट गोष्टी दिल्या. तुम्ही स्वतःचा इतिहास वाचला पाहिजे. तुम्हाला थोडी जरी लाज असेल तर तुम्ही शरमेने मरून जाल. स्वतःला बुद्धिमान म्हणवणारे व स्वतःला जगातील संस्कृतीचे शासक म्हणवणारे हे लोक क्रुरता व रक्ताला चटावलेल्या पद्धतीमुळे ते हिन रक्ताचे आहेत असे दर्शविते.” न्यायालयाने थांबण्यास सांगूनही ते बोलत राहिले.
मला फाशीच्या शिक्षेची काळजी नाही. माझ्या दृष्टीने ती नगण्य आहे. मी एका हेतूसाठी मरण पत्करत आहे. आम्ही या ब्रिटिश सरकारमुळे त्रासलेले आहोत. मला मरणाची भीती नाही. मला गर्व वाटतो आहे की मी माझ्या मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी बलीदान करत आहे आणि मी आशा करतो की माझ्यानंतर हजारो देशवासी पुढे येतील व तुम्हा घाण कुत्र्यांना हाकलून माझा देश स्वतंत्र करतील. मी इंग्रज ज्युरी समोर आहे आणि इंग्रज कोर्टात आहे. तुम्ही भारतात गेल्यावर तुम्हाला बक्षिस मिळते व हाउस ऑफ कॉमन्स मधे तुम्ही बसता. आम्ही इंग्लंडमध्ये येतो व आम्हाला फाशीची शिक्षा सुनावली जाते. मी कशाची काळजी करत नाही पण असा एक काळ येईल की तुम्ही कुत्रे भारतात याल तेव्हा तुम्हाला हाकलले जाईल. तुमचा साम्राज्यवाद संपवला जाईल. भारतातील रस्त्यावर हजारो महिला व मुलांवर मशीनगन चालवली जाते आणि तुम्ही लोकशाही व ख्रिश्चनॅटीचा तोरा मिरवता.
तुमचे वागणे – मी ब्रिटिश सरकारच्या वागण्याबद्दल बोलत आहे. मला इंग्रज लोकांबद्दल बोलायचे नाही. माझे इंग्लंडमध्ये राहणारे इंग्रज मित्र भारतातील मित्रांपेक्षा जास्त आहेत. मला इंग्रज कामगारांबाबत सहानुभूती आहे. माझा ब्रिटिश साम्राज्यवादाला विरोध आहे. कामगारांनापण त्रास होतो आहे. या डॉग्स आणि मॅड बीस्टमुळे सर्वांना खूप त्रास होत आहे. भारतामध्ये फक्त गुलामी आहे.”
हत्या, विच्छेदन, नाश – ब्रिटिश साम्राज्यवाद. याबाबत लोकांना वर्तमानपत्र वाचायला मिळत नाही. आम्हाला भारतात काय चाललंय ते माहित आहे. याठिकाणी न्यायालयाने थांबण्याचा इशारा दिला पण तरीही सरदार बोलत होते. ते पुढे म्हणाले, “तुम्ही मला बोलण्यास सांगितले व मी बोलत आहे. तुम्हाला भारतात तुम्ही काय करत आहात हे ऐकण्याची इच्छा नाही. ब्रिटिश साम्राज्यवादाचा धिक्कार असो. ब्रिटिश कुत्र्यांचा धिक्कार असो.” या शेवटच्या उदगाराबरोबर उधमसिंग यांनी सॉलिसिटरच्या टेबलवर हात मारला. १९९६ साली हे भाषण प्रसिद्ध करण्यात आले. ब्रिटिश सरकारबद्दल त्या काळात भारतीय जनतेमध्ये असणाऱ्या तिरस्काराचे दर्शन घडवणारे आहे.
Real speech of Sardar Udham Singh that was banned for decades in his courtroom trial
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे महापालिकेत महिलाराज ; नव्या सभागृहात ८७ नगरसेविकांचा पन्नास टक्के आरक्षणानुसार प्रवेश
- IND vs SCO T20 Playing 11: भारतीय संघाला स्कॉटलंडविरुद्ध मोठा विजय नोंदवावा लागेल, ही शेवटची प्लेयिंग इलेव्हन असू शकते
- अनिल देशमुखांच्या कोठडीची मुदत संपण्यापूर्वी मुलगा ऋषिकेश देशमुखची ईडी चौकशी
- बीड : दिवाळी दिवशीच बस स्थानकातच चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न