विशेष प्रतिनिधी
मुंबई : अमृता फडणवीस यांनी ‘मानीके मागे हीते’ हिंदीमध्ये गायले आहे. या गाण्यामध्ये अमृता यांनी रॅप सॉंगचा वापर केला आहे. ट्विटरवर या गाण्यावरील कॉमेंट्सचा पर्याय फडणवीस यांनी बंद करून ठेवला आहे. गायिका अमृता फडणवीस या नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. गाण्यामुळे तसेच काहीवेळा अप्रत्यक्षपणे राजकीय भाष्य केल्यामुळे त्या मीडियावर चर्चेत असतात.
Reaction to the song ‘Manike Mage Hite’ sung by Amrita Fadnavis
अमृता यांचे नवीन गाणे हा आता नवीन विषय आहे. श्रीलंकन गाणे ‘मानीके मागे हिते’ त्यांनी हिंदीमध्ये गायले आहे. या गाण्याचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंग अकाउंटवर त्यांनी शेअर केला आहे. श्रीलंकेचे गायक योहानी डिलोका डिसिल्वा यांचे हे गाणे प्रचंड गाजले आहे. अमृतानी ती चाल वापरून हिंदी गाणे केले आहे. यात रॅप सॉंग पद्धतीचा वापरपण केला आहे. कुल गाण्यासोबत चील पील व्हा अशा टायटलसह हे गाणं पोस्ट केले आहे. या गाण्यामुळे त्यांना ट्रोल करणेत येते आहे. पण ट्विटरवर गाणे शेअर करताना अमृता यांनी कॉमेंट ऑप्शन बंद केला आहे.
रानू मंडल! श्रीलंकन गायिका योहाणीच्या ‘माणिके मागे हिथे’ गाण्यामूळे होताहेत पुन्हा व्हायरल
फेसबुकवर काहींनी कौतुक तर काहींनी टिका केली आहे. पुरुष दिवसाच्या प्रसंगी हे ऐकावे लागते आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया आहे. तसेच गायीकांनी नवीन गाणी गायली पाहिजे दुसऱ्या गाण्यांची वर्जन नको असेही म्हटले जाते आहे.
नदी संवर्धन, स्त्री भ्रूणहत्या या विषयावर त्यांनी गाणी केली आहेत. मानिके मागे हिते २२ मे २०२१ ला युट्यूबवर आले होते. त्याला जगभरातील लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ७५ मिलीयनपेक्षा जास्त लोकांपर्यंत हे गाणे पोचले आहे.
Reaction to the song ‘Manike Mage Hite’ sung by Amrita Fadnavis
महत्त्वाच्या बातम्या
- नवज्योत सिंग सिद्धूंचे पाकिस्तान प्रेम पुन्हा उफाळले, म्हणाले- इम्रान खान माझे मोठे भाऊ, मला खूप प्रेम दिले!
- हिंदी बिग बॉस मध्ये अभिजित बिचुकलेची होणार एन्ट्री
- कृषी कायदे रद्द घेतलेत, आता सीएए – एनआरसी हे कायदे मागे घ्या; मौलाना अर्षद मदानींची मोदींकडे मागणी
- “कामगारांचे निलंबन करूनही प्रश्न मिटत नसेल तर….” ; अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर साधला निशाणा