• Download App
    रानू मंडल! श्रीलंकन गायिका योहाणीच्या 'माणिके मागे हिथे' गाण्यामूळे होताहेत पुन्हा व्हायरल | Raju Mondal is back! Viral video shows ranu mondal singing yohani's manike maghe hithe

    रानू मंडल! श्रीलंकन गायिका योहाणीच्या ‘माणिके मागे हिथे’ गाण्यामूळे होताहेत पुन्हा व्हायरल

    विशेष प्रतिनिधी

    दिल्ली : कधी कोणाचे नशीब बदलेल, काही सांगता येत नाही. रानू मंडल हे नाव तुम्ही ऐकलं असणारच. रेल्वे स्टेशन वर दोनवेळचे पोट भरण्यासाठी गाणं म्हणणारी ही बाई एका रात्रीमध्ये सुपरस्टार बनली होती. लाईट कॅमेरा अक्शन या शब्दांनी तिच्या आयुष्यामध्ये एक मोठा बदल घडवून आणला होता. हिमेश रेशमियासोबत ती एका म्यूझिक व्हिडिओमध्ये झळकली होती.

    Raju Mondal is back! Viral video shows ranu mondal singing yohani’s manike maghe hithe

    बऱ्याच लोकांनी त्यांच्या आवाजाची तुलना लता मंगेशकर यांच्यासोबत देखील केली होती. मुंबईत एकेकाळी फिल्मस्टार्सच्या घरी मेड म्हणून काम करणाऱ्या राणू मंडल यांचं नशीब पालटले. आणि लोकांना जादू या गोष्टींवर कदाचित विश्वास बसू लागला होता. पण म्हणतात ना, सगळं काही सुरळीत चालू असताना कुठे ना कुठे काहीतरी वाईट घडण्याची सुरूवात झालेली असतेच. आणि झालेही तसेच, एका रात्रीत त्यांना पूर्ण मिळालेले स्टारडम गायब झाले आणि त्या इंटरनेटवर कुठेही दिसेनाशा झाल्या.


    मनिके मागे हिथे झाले ‘मा मांटी मानुष हिथे’! ममता बॅनर्जीना समर्पित हे गाणे वापरले जाणार भवानीपुर बायपोल कॅम्पेन मध्ये


    पण नुकताच त्यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसून येतोय. श्रीलंकन सिंगर योहानीचे ‘मनीके मागे हीथे’ हे गाणे सध्या ट्रेंडिंग गाणे आहे. इंटरनेट रील्स, शॉर्ट व्हिडिओज सर्वत्र हे गाणे ट्रेण्ड करत आहे. याच ट्रेंडिंग गाण्यावर रानू मंडल गाताना दिसून येत आहेत आणि त्यांचा हा व्हिडीओ देखील व्हायरल होताना दिसून येतोय.

    Raju Mondal is back! Viral video shows ranu mondal singing yohani’s manike maghe hithe

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी