• Download App
    पुनित राजकुमार यांना कर्नाटक रत्न अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार | Puneet Rajkumar will be honored with Karnataka Ratna Award

    पुनित राजकुमार यांना कर्नाटक रत्न अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार

    विशेष प्रतिनिधी

    बंगलोर : कन्नड सुपरस्टार पुनित कुमार यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांना प्रचंड दु ख झाले होते. त्यांचे दु:ख इतके मोठे होते की, त्यांनी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना देखील पुनीत कुमार यांच्या मृत्यूला जबाबदार धरले होते.

    Puneet Rajkumar will be honored with Karnataka Ratna Award

    आपल्या मरणानंतर आपले डोळे दान करण्यात यावेत, अशी पुनीत यांची इच्छा होती. त्यांच्या डोळ्यांमुळे चार लोकांना दृष्टी मिळाली होती. ह्या गुणी आणि प्रसिध्द अभिनेत्याला मरणोत्तर कर्नाटक रत्न अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज यानी नुकतीच ही बातमी जाहीर केली आहे. राज्य सरकारतर्फे पुनीत कुमार यांना कर्नाटक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे.


    पुनीत राजकुमारच्या फॅमिली डॉक्टरांना का दिले जातेय पोलीस संरक्षण?


    पुनीत कुमार यांच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांना प्रचंड धक्का बसला होता. अरुण नावाच्या एका त्यांच्या फॅन मार्फत त्यांच्या मृत्यूबद्दल इन्व्हेस्टिगेशन करण्यात यावी असे पीटिशन सुरू करण्यात आले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार पुनीत कुमार यांच्या मृत्यूची चौकशी झालीच पाहिजे.

    Puneet Rajkumar will be honored with Karnataka Ratna Award

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी