विशेष प्रतिनिधी
दिल्ली : ट्विटरवर एक पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. एका केली अँड्र्यू नावाच्या स्त्रीने आपल्या पाळीव कुत्रा याबद्दल एक अनुभव शेअर केला आहे. तिची लहान मुलगी काही कारणाने आजारी होती. उपचारासाठी तिला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. ती, तिचा नवरा, मुलगी आणि त्यांच्या घरातील पाळीव कुत्रा हे सगळे जण हॉस्पिटलमध्ये होते.
Pet dog saves little girl’s life!
रात्रीच्या वेळी केली आणि तिच्या नवऱ्याला झोप लागली होती पण त्यांचा पाळीव कुत्रा हेन्री अचानक भुंकू लागला. काय झाले ते पाहायला गेले, तर त्यांच्या मुलीचे ब्रीदिंग थांबले होते. त्यांनी तात्काळ डॉक्टरांना बोलावले. आणि तिच्यावर तातडीने उपचार सुरू केले.
या घटनेची माहिती त्यांनी ट्विटरवर देत म्हटले आहे की, खरंच आपण पाळीव प्राण्यांना डीझर्व नाही करत. कारण ते आपल्यापेक्षा जास्त सेंसेटिव्ह, प्रामाणिक आणि प्रेमळ असतात.
तिच्या या ट्विटला नेटकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. जवळपास 250 हजाराच्यावर लोकांनी या पोस्टला लाईक दिले आहे. सर्वजन हेन्रीचे प्रचंड कौतुक करताना दिसून येत आहेत.
Pet dog saves little girl’s life!
महत्त्वाच्या बातम्या