• Download App
    अभय देओल आणि लिओनार्डो डिकॅप्रियो यांच्या प्रॉडक्शन हाऊस मार्फत 'पेप' हा Guglielmo Papaleo यांच्या जीवनावर आधारित सिनेमा लवकरच होणार प्रदर्शित | Pep, a film based on the life of Guglielmo Papaleo, will be released soon through the production house of Abhay Deol and Leonardo DiCaprio

    अभय देओल आणि लिओनार्डो डिकॅप्रियो यांच्या प्रॉडक्शन हाऊस मार्फत ‘पेप’ हा Guglielmo Papaleo यांच्या जीवनावर आधारित सिनेमा लवकरच होणार प्रदर्शित

    विशेष प्रतिनिधी

    मुबंई : टायटॅनिक स्टार लिओनार्डो डिकॅप्रियो याच्या अँपियन वे प्रॉडक्शन्स कंपनीने ‘जिंदगी ना मिलेगा दोबारा’ फेम अभिनेता अभय देओलची कॅनडा बेस कंटेंट निर्मिती कंपनी ब्लिसपॉइंट एंटरटेनमेंट सोबत हातमिळवणी केली आहे. या मध्ये सिंगापूरच्या गोल्डन रेशो फिल्म्स या कंपणीचाही सहभाग आहे. कारण आहे ‘पेप’ या सिनेमाची निर्मिती. हा सिनेमा 20 व्या शतकातील बॉक्सर Guglielmo Papaleo यांचा बायोपिक सिनेमा आहे. Guglielmo Papaleo हे पेप  म्हणूनही प्रसिद्ध आहेत.

    Pep, a film based on the life of Guglielmo Papaleo, will be released soon through the production house of Abhay Deol and Leonardo DiCaprio

    ह्या प्रोजेक्टची सुरुवात दोन वर्षांपूर्वी झाली होती. अभय देओल आणि मुंबईस्थित निर्माता रतन गिन्वाला यांच्या ब्लिसपॉईंट या कंपनीने हा सिनेमा बनवण्याचे आधी ठरवले होते.


    कॅमिला कॅबेलो, लिओनार्डो डिकॅप्रियो, लेडी गागा यांनी हवामान बदलावरील बिल पास करण्यासाठी अमेरीकन काँग्रेसकडे केली मागणी


    पेप म्हणजेच Guglielmo Papaleo ह्यांच्या 26 वर्षाच्या  दीर्घ करियर मध्ये त्यांनी जवळपास 2000 पेक्षा जास्त बॉक्सिंगचे राऊंड खेळले आहेत. प्रत्येकाच्या आयुष्याला जशी एक ट्रॅजेडी नावाची गोष्ट झपाटलेली असते. तसेच त्यांच्या ही आयुष्यात ट्रॅजेडी झाली होती. त्याचा मुलगा मादक पदार्थांच्या आहारी गेला होता. त्यावेळी त्यांनी बॉक्सिंग मध्ये पुनरागमन केले होते. त्यांचे जे कमबॅक, यश, आयुष्यातील स्ट्रगल या सर्व गोष्टींवर आधारित हा सिनेमा असणार आहे.

    बँड ऑफ ब्रदर्स फेम अभिनेता जेम्स मारिओ या सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहे. तर कीर गिलख्रिस्ट हा अभिनेता पेपच्या मुलाचा रोल प्ले करणार आहे. या चित्रपटा मधील फीमेल कॅरेक्टर कोण प्ले करणार याबाबत अजून कोणत्याही अभिनेत्रीचे नाव फायनल झालेले नाहीये. अभय देऊ आणि लिओनार्डो डिकॅप्रियो यांच्या या कंपनीमार्फत बनवला जाणारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.

    Pep, a film based on the life of Guglielmo Papaleo, will be released soon through the production house of Abhay Deol and Leonardo DiCaprio

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी