विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलीवूडमधील एक उत्कृष्ट कलाकार असलेले मनोज बाजपेयी यांनी अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर द फॅमिली मॅन या सीरिजमध्ये काम केले होते. आणि या सिरीजने त्यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन बसवले होते. या सीरिजमुळे त्यांना जगप्रसिद्ध कलाकार म्हणून ओळखले जाऊ लागले. या सीरिजचा दुसरा सीझन ही प्रदर्शित झाला आहे. आणि तोही पहिल्या सीझन इतकाच प्रचंड हिट ठरला आहे.
People are addicted to webseries and OTT platforms; Actor Manoj Vajpayee
नुकताच त्यांनी एका पब्लिकेशनला दिलेल्या मुलाखतीमध्ये ओटीटी प्लँटफॉर्म बद्दल आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणतात की, जेव्हापासून कोरोना काळ सुरू झाला आहे तेव्हापासून लोकांना वेबसीरिजचे आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचे वेड लागलेले आहे. या जगाच्या बाहेर देखील एक जग आहे, याची त्यांना जाणीव आहे तरीही त्यांना ओटीटीचे जग सोडायचे नाही. आणि हे अतिशय दु खद आहे.
द फॅमिली मॅन २ फेम अभिनेत्री समानथाचे बॉलीवूड पदार्पण
भारतीय सिनेमाबद्दल आपले मत व्यक्त करताना वाजपेयी म्हणतात की, भारतीय सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म मुळे नक्कीच बदलत आहे. आधी फक्त सुपरस्टारच्या नावाने सिनेमे चालायचे. पण आता कंटेंटला महत्त्व आलेले आहे. हे सुपरस्टार इथे राहतीलच. पण आता सुपरस्टारचे स्वरुप देखील वेगवेगळे असणार आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्मचा एक सुपरस्टार असणार, युट्यूबचा एक सुपरस्टार असणार, सोशल मिडीयाचा एक सुपरस्टार असणार तर सिनेमागृहांच्या एक सुपरस्टार असणार. असे मत त्यांनी मांडले आहे.
मनोज वाजपेयी सध्या राम रेड्डी, कनु बहल आणि राहूल चितलेंगा या दिग्दर्शकांसोबत काम करणार आहेत. लवकरच त्यांचे अतिशय महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट प्रदर्शित होणार आहेत.
People are addicted to webseries and OTT platforms; Actor Manoj Vajpayee
महत्त्वाच्या बातम्या
- मधुबन में राधिका नाचे गाण्यावर बोल्ड स्टेप्स, सनी लियोनीच्या अटकेची मागणी, सलमानवरही कारवाईचा आग्रह
- नितीन गडकरी म्हणाले, फुकट दिले तर लोकांना हरामाचा माल वाटतो
- UNSC : 2022-भारत भूषवणार UNSC दहशतवाद विरोधी समितीचे अध्यक्षपद; दुसऱ्यांदा जबाबदारी
- लाईफ स्किल्स : सध्याच्या स्पर्धेत स्वतःच्या व्यक्तीमत्वाला द्या असा आकार
- मनी मॅटर्स : आर्थिक फसवणुकीला तसेच सायबर गुन्ह्यांना बळी पडू नका
- शिवसेना- राष्ट्रवादीमधील संघर्ष झाला हिंसक, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी यांच्या वाहनावर हल्ला