• Download App
    कॅट-विकि नाही तर विकीच्या आई वडिलांच्या प्रेमात आहे नेटकरी | Not Kat-Vicky, netizens are in love with vicky's parents

    कॅट-विकि नाही तर विकीच्या आई वडिलांच्या प्रेमात आहे नेटकरी

     विशेष प्रतिनिधी

    मुंबई : नुकताच कॅटरीना कैफ आणि विकी कौशल यांचा विवाहसोहळा अतिशय धुमधडाक्यात पार पडला. हा विवाहसोहळा राजस्थानमधील सिक्स सेन्स रिसॉर्ट्स, बारवरा येथे पार पडला. क्लोज फॅमिली आणि फ्रेंड्स यांच्या साक्षीने दोघांनी ही लग्नगाठ बांधली. मेहंदी, संगीत, लग्न असे सर्व विधी आटोपून हे सर्वजण पुन्हा मुंबईला परत आले आहेत. लग्न झाल्यानंतर विकी कौशल आणि कॅटरिना कैफ दोघेही प्रायव्हेट विमानामधून डायरेक्ट मालदीवला फिरण्यासाठी गेले आहेत, अशीही सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

    Not Kat-Vicky, netizens are in love with vicky’s parents

    तर इंटरनेट मात्र सध्या विकी कौशल आणि कॅटरिना या नवविवाहित जोडप्याच्या प्रेमात नसून, सध्या नेटकरी विकी कौशलच्या आई वडिलांच्या प्रेमात पडले आहेत. त्यांचा साधेपणा लोकांना अक्षरशः भावाला आहे.


    पाहा कॅटरिना कैफ आणि विकि कौशल यांच्या लग्नातील हळदीचे फोटो


    एअरपोर्टवर विकी कौशलच्या वडीलांनी पापाराझींना दोन्ही हात जोडून प्रणाम केला. त्यांना मिठाई दिली. त्यांचा हा साधेपणा पाहून नेटकरी कॅटरिना आणि विकीच्या प्रेमात पडलेले नसून, विकीच्या आईवडिलांच्या प्रेमात पडले आहेत. बऱ्याच लोकांनी या दोघांचा फोटो ट्वीट करत म्हटले आहे की, आमच्या आई वडिलांसारखेच वाटतात. अतिशय साधे सरळ आणि नम्र लोक आहेत.

    विकिचे वडील श्याम कौशल स्टंट डिरेक्टर आहेत. कमीने, क्रिश अश्या बऱ्याच सिनेमांचे त्यांनी स्टंट डिरेक्टर म्हणून काम केले आहे. मुंबई मध्ये फक्त नोकरी करायच्या उद्देशाने ते आले होते. सुरुवातीला फक्त 350 रुपये पगाराची नोकरी त्यांनी केली होती. त्या नंतर एका पीजी मध्ये ते शिफ्ट झाले. तिथे सर्वजण सिनेमात स्टंट डिरेक्टर म्हणून काम करायचे आणि मुख्य म्हणजे दिवसाच्या शेवटी त्यांना पैसे मिळायचे. 350 रुपयांसाठी महिन्याची वाट कशाला पाहायची आणि स्टंट डिरेक्टर म्हणून काम केल्यास रोजच्या रोज पैसे मिळतील ह्या उद्देशाने त्यांनी स्टंट डिरेक्टर म्हणून काम करण्यास सुरू केले होते. खुद्द विकीने ही गोष्ट कपिल शर्माच्या शो मध्ये सांगीतली होती. त्यांना स्क्रिन अवॉर्ड फॉर बेस्ट ऍक्शन हा अवॉर्ड देखील मिळाला आहे.

    Not Kat-Vicky, netizens are in love with vicky’s parents

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी