• Download App
    2022 मध्ये प्रदर्शित होणार आलीया भट्टचा गंगुबाई काठियावाडी सिनेमा | Much awaited cinema gangubai kathiawadi has grabbed it's release date

    2022 मध्ये प्रदर्शित होणार आलीया भट्टचा ‘गंगुबाई काठियावाडी’ सिनेमा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : बाजीराव मस्तानी, खामोशी, रामलीला, हम दिल दे चुके सनम, ब्लॅक, पद्मावत या उत्कृष्ट सिनेमांचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी एक नवीन सिनेमा घेऊन लवकरच येत आहेत. सुपर टॅलेंटेड अभिनेत्री आलिया भट्ट आणि संजय लीला भन्साळी प्रथमच एकत्र काम करताना दिसून येणार आहेत. ‘गंगुबाई काठियावाडी’ हा सिनेमा बऱ्याच दिवसांपासून प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. आधी हा सिनेमा 31 जुलै 2021 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. नंतर  हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर पप्रदर्शित होईल असे बोलले जात होते.

    Much awaited cinema gangubai kathiawadi has grabbed it’s release date

    या सिनेमाच्या प्रदर्शना बाबत बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या होत्या.अखेर भन्साळी प्रोडक्शन यांच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 6 जानेवारी 2022 रोजी हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


    यंदा कर्तव्य आहे! : बॉलीवूड अभिनेता रणबीर आणि आलिया या वर्षी करणार लग्न, या अभिनेत्रीने केले शिक्कामोर्तब


    गंगूबाई काठियावाडी हा सिनेमा सत्य घटनांवर आधारित सिनेमा असणार आहे. गंगुबाई काठियावाडी या गुजरातमधील एका लहानशा शहरातून मुंबईमध्ये सिनेसृष्टीमध्ये करिअर करण्यासाठी घरातून पळून आल्या होत्या. चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेत्री बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या गंगुबाई काठेवाडी यांचा गुजरात ते कामाठीपुरा पर्यंतचा जीवन प्रवास या सिनेमामध्ये दाखवला जाणार आहे.

    हा सिनेमा आलीय भट्टच्या करियर मधील एक वन ऑफ द बेस्ट सिनेमा असणार आहे. लवकरच आलियाचे ब्रह्मस्त्र, राजा और राणी की प्रेम कहाणी हे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.

    Much awaited cinema gangubai kathiawadi has grabbed it’s release date

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी