विशेष प्रतिनिधी
मुंबई : कॅटरिना कैफ आणि विकी कौशल एका शाही विवाह सोहळ्यामध्ये विवाहबद्ध झाले आहेत. विवाहाला काही दिवस उलटले नाहीत तरी दोघेही लगेच कामावर रुजू झाले आहेत. विजय सेतुपती आणि कॅटरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असणारा ‘मेरी ख्रिसमस’ ह्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे.
Merry Christmas: Vijay Sethupati and Katrina Kaif will be seen in Shriram Raghavan’s ‘Merry Christmas’
हा चित्रपट श्रीराम राघवन दिग्दर्शित करणार आहेत. हे तेच श्रीराम राघवन आहेत ज्यांनी अंदाधुंद सारखा मास्टरपीस दिग्दर्शित केला होता. त्याचप्रमाणे त्यांनी एजंट विनोद आणि बदलापूर यांसारखे अॅक्शन थ्रिलर मिस्टीरियस सिनेमे देखील दिग्दर्शित केले आहेत.
विजय सेतुपती हे नाव आताश्या बॉलीवूडमधील तसेच महाराष्ट्रातील एव्हाना अख्ख्या भारतातील लोकांना माहीत झाले आहे. विजय सेतुपती आणि त्रिशा यांची प्रमुख भूमिका असणारा 96 हा चित्रपट सुपरडुपर हिट सिनेमा ठरला होता. डीप, इंटेन्स रोमॅन्टिक कथेमधला तुमच्या आमच्यातलाच एक वाटणारा विजय सर्वांना भावून गेला होता.
कॅटरिना विकीच्या लग्नातील खास फोटो शूट, कॅटरिनाची साडी बनवायला ४० कारागिरांना १८०० तास लागले
कॅटरिना कैफने आपल्या इंस्टाग्रामवर एक स्पेशल पोस्ट शेअर करत या चित्रपटाची घोषणा केली आहे. नुकताच कॅटरिना कैफचा अक्षय कुमारसोबत सूर्यवंशी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपटदेखील बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.
कॅटरिना कैफचे आगामी टायगर 3 आणि जी ले जरा हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. जी ले जरा या चित्रपटामध्ये ती प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्ट या दोघींसोबत काम करताना दिसून येणार आहे. झोया अख्तर हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे.
Merry Christmas: Vijay Sethupati and Katrina Kaif will be seen in Shriram Raghavan’s ‘Merry Christmas’
महत्त्वाच्या बातम्या
- लष्कराचे मिग-21 विमान कोसळले, पायलटचा मृत्यू
- महाराष्ट्रात कोरोनाचे निर्बंध, रात्री नऊ ते सकाळी सात वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश
- हद्दीत घुसणाऱ्यांनाच नाही सीमेपलीकडील दहशतवाद्यांनाचाही खात्मा करू शकतो, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
- बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या ब्राम्हणांना शिव्या
- पवार घराण्यावर विश्वास ठेऊ नका असे सांगितले होते, गोपीचंद पडळकर यांची टीका
- खोट्या अॅट्रॉसिटींना बसणार चाप, साक्षीदार नसेल तर गुन्हा ठरू शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल