• Download App
    मणी हाईस्टचा कोरियन रिमेक येतोय, 2022 मध्ये प्रदर्शित होणार कोरियन मणी हाईस्ट | korean remake of superhit netflix series money heist will release in 2022

    मणी हाईस्टचा कोरियन रिमेक येतोय, २०२२ मध्ये प्रदर्शित होणार कोरियन मणी हाईस्ट

    विशेष प्रतिनिधी

    मुबंई : मणी हाईस्ट हा नेटफ्लिक्स वरील जग प्रसिद्ध शो आहे. ह्या सिरीज मधील कलाकार, गाणी देखील प्रसिद्ध आहेत. उद्या म्हणजे 3 डिसेंम्बर, 2021 रोजी ह्या सिरीजचा शेवटचा सिजन प्रदर्शित होणार आहे. तर मनी हाईस्टच्या ऑफिशियल यु ट्यूब चॅनेलवर आज एक नवीन घोषणा करण्यात आली आहे.

    korean remake of superhit netflix series money heist will release in 2022

    ह्या सिरीजचा कोरियन रिमेक 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे. ह्या रिमेक मध्ये squid game फेम अभिनेता पार्क हे सु बर्लिन ची भूमिका साकारताना दिसून येणार आहे. पार्कने squid game चा सांग हु हे पात्र निभावले होते. या अभिनेत्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर याबाबतची ऑफिसर घोषणा देखील केली आहे.


    बर्लिनच्या चाहत्यांसाठी खुशखबर : मणी हाईस्ट नंतर बर्लिन दिसणार आणखी एका नेटफ्लिक्स शो मध्ये


    या फोटोंमध्ये मनी हाइट्समधील मास्क या अभिनेत्याने हातात घेतलेला दिसून येतोय. आणि अभिनेता आपल्या कॅप्शनमध्ये सांगतोय की, बर्लिन म्हणजे पेड्रो अलोन्सो याने मला हा मास्क पाठवला आहे. जेव्हा 2022 मध्ये आम्ही कोरियन रिमेक प्रदर्शित करू तेव्हा असाच मास्क मी त्याला देखील पाठवणार आहे. आशा करतो की, जगातील सर्व लोकांकडून मणी हाईस्टच्या कोरियन रिमेकला ही तितकेच प्रेम मिळेल जितके मनी हाईट्सला भेटले होते.

    korean remake of superhit netflix series money heist will release in 2022

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी