विशेष प्रतिनिधी
मुंबई : विद्या बालनची प्रमुख भूमिका असणारा कहानी हा सिनेमा आठवतोय? हा सिनेमा प्रचंड हिट ठरला होता. सिनेमातील हरएक पात्र, सिन अतिशय डिटेल मध्ये लिहिण्यात आले होते. आणि दिग्दर्शकांनी तर है सिनेमा मधून जणू जादूच निर्माण केली होती. सुजोय घोष यांनी हा सिनेमा बनवला होता. तेच या सिनेमाचे दिग्दर्शक होते. या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर घोष आणि अभिनेत्री करिना कपूर एकत्रीत आणखी एक थ्रिलर सिनेमा बनवण्याच्या विचारांमध्ये होते. पण मागील 10 वर्षांपासून हा विचार काही कृतीमध्ये परिवर्तित झाला नाही.
Kareena Kapoor and Kahani movie director Sujoy Ghosh together for a new thriller movie
परंतु थ्रिलर मुव्ही चाहत्यांसाठी आता एक खुशखबर आहे. करिना कपूर खान आणि सुजोय घोष यांनी एकत्र येऊन एक थ्रिलर सिनेमाच्या प्रोजेक्टवर काम चालू केले आहे. फेब्रुवारी पासून या सिनेमाचे शूटींग सुरू होणार आहे. सध्या करिना कपूर आमिर खानसोबतच्या लाल सिंग चड्ढा या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा फॉरेस्ट गम्प या सुपरहिट हॉलीवूड सिनेमाचा हिंदी रिमेक असणार आहे.
माझ्या मुलांना भेदभाव न करता समाजात राहण्यास शिकवणार – करिना कपूर
घोष दिगदर्शीत थ्रिलर फिल्मची निर्मिती जय सेवाक्रमनी करणार आहेत. तर संपूर्ण फिल्म भारतामध्येच शूट केली जाणार आहे. दार्जिलिंग आणि कालिमपाँग या भागामध्ये या सिनेमाचे शूटींग होईल. सुजॉय घोष यांनी सांगितल्याप्रमाणे या सिनेमाची स्टोरी एकदम हटके आहे. बरेच ट्विस्ट अँड टर्न्स असणारा हा थ्रीलर सिनेमा आजवर बॉलीवूडमध्ये बनवलेल्या सिनेमांपेक्षा खूप वेगळा असेल असे त्यांनी सांगितले आहे.
Kareena Kapoor and Kahani movie director Sujoy Ghosh together for a new thriller movie
महत्त्वाच्या बातम्या
- भाजप उभा करेल सिल्वासात उभा छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा
- शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी शर्लिन चोप्राविरोधात उचलले मोठे पाऊल , 50 कोटींचा मानहानीचा दाखल केला खटला
- भारताने कोरोना लसीकरणात 99 कोटींचा टप्पा गाठला, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसूख मांडविया यांनी ट्विटरवरून दिली माहिती
- ‘टार्गेट किलींग ‘ प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला, एजन्सी करेल पाकिस्तानचा पर्दाफाश
- CONGRESS : नाना पटोलेंच्या नेतृत्वावरून काँग्रेसमध्ये नाराजी ; दहा वर्षांपासून प्रवक्ते असणारे सचिन सावंत यांचा राजीनामा